

भाजपा शहराध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांच्या घरी घेतली आ. प्रा राम शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली
जामखेड प्रतिनिधी
भाजप शहराध्यक्ष शिवकुमार डोंगरे यांचे वडील कै. महादेव ड़ोंगरे यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्यामुळे त्यांच्या डोंगरे वाडा येथील निवासस्थानी आ. प्रा राम शिंदे यांनी सांत्वनपर भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वर्गीय महादेव डोंगरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माजी सभापती रवी सुरवसे, माजी सभापती डॉ भगवान मुरूमकर, भाजपा अल्पसंख्याकचे अध्यक्ष सलिम बागवान, भाजपा तालुका अध्यक्ष अजय (दादा) काशिद, सभापती शरद कार्ले, नगरसेवक अमित चिंतामणी, डॉ ज्ञानेश्वर झेंडे, बिबीशन धनवडे, तात्याराम पोकळे, संजय राऊत सर, मोहन (मामा) गडदे, खर्डा येथिल माजी सरपंच शिवकुमार गुळवे, प्रवीण सानप, पाडुरंग माने, अण्णासाहेब ढवळे, प्रवीण बोलभट, जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचर्णे, आर्जुन म्हेत्रे, गोरख धनवट, संतोष गव्हाळे, दादा कलासागर, नितीन धनवटे, फुलमाळी, आप्पा ढगे, शरद काका देशमुख, डॉ अल्ताफ शेख, प्रविण चोरडिया, महेश मासाळ, रुऋकेष मोरे, राम पवार, तुषार बोथरा उपस्थित होते.

याबरोबरच श्री गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापुरकर महाराज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अरुण जाधव, दिलीपशेठ बाफना, मनसे चे नेते गणेश पवार, मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, पवन राळेभात, ओबीसीचे जिल्हा अध्यक्ष माऊली (मामा) गायकवाड, आकाश बाफना,यांनी देखील सांत्वनपर भेटी दिल्या तसेच शिवानंद स्वामी, लिंगायत समाज बांधव, पाहुणे नातेवाईक मंडळी व मित्रपरिवार हे अतंविधीच्या दरम्यान मोठ्या संख्येने उपस्थित होते.








