शासनाच्या बाजार समितीतील “शेतमाल तारण योजनेचा ” लाभ घ्यावा – सभापती शरद कार्ले

जामखेड प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन व राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येत असलेली “शेतमाल तारण योजना” जामखेड बाजार समितीत कार्यान्वित असुन या योजनेचे प्रमुख उध्दिष्ठ म्हणजे वारंवार कमी होणारे शेतमालाचे बाजारभाव व त्यामुळे शेतकऱ्यांच होणारं नुकसान टाळणे हेच असून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती पै. शरद कार्ले यांनी केले आहे.

या बाबत जाहिर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, योजनेचे प्रमुख उध्दिष्ठ म्हणजे वारंवार कमी होणारे शेतमालाचे बाजारभाव व त्यामुळे शेतकऱ्यांच होणारं नुकसान टाळणे हेच असून आपल्या शेतमालाचा बाजारभाव कमी निघाल्यास सदरहु शेतमाल शेतकऱ्यांना वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवण्याची सुविधा या योजनेमध्ये आहे.

 

वखार महामंडळाच्या गोदामामध्ये साठवणुक केलेल्या शेतमालाची पावती बाजार समितीकडे सादर केल्यानंतर बाजार समितीच्या माध्यमातुन पणन मंडळाकडे कर्ज पुरवठ्याची प्रक्रीया केली जाते. त्यानुसार सदर शेतकऱ्यांना त्यांनी गोडाऊनमध्ये ठेवलेल्या शेतमालाच्या एकुण किमतीच्या ७० % कर्ज हे ६% व्याजदराने देण्यात येईल व त्यासाठी ६ महीन्याची मुदत असेल. तसेच
वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या शेतमालाला एक महीन्यासाठी प्रती ५० किलोसाठी ८ रूपये एवढे भाडे वखार महामंडळाने निर्धारीत करून दिले आहे.

परंतु शेतकऱ्यांनी वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेल्या शेतमालाचे भाडे व ईतर खर्च हा शेतकऱ्यांकडून न घेता तो सर्व खर्च बाजार समितीच करणार आहे. तसेच वखार महामंडळाच्या गोदामामध्ये ठेवलेला संपुर्ण शेतमाल हा विमा संरक्षित असेल आणि शेतमालाला कीड लागणार नाही याची काळजी वखार महामंडळाकडुनच घेतली जाईल.

तरी जामखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शेतमाल काढणीच्या ऐणवेळी आवक वाढल्यानंतर कमी होणाऱ्या बाजारभावापासुन आपलं नुकसान टाळावं असे आवाहन जामखेड बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती शरद (दादा) कार्ले यांनी केले आहे.

चौकट

जामखेड बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती पै. शरद कार्ले यांनी आ. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना शेतकऱ्यांना दिलेल्या अश्वासनानुसार व हितासाठी पदभार घेताच काम सुरू केले असून. जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक चांगली बाब आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here