जामखेड येथे गुटख्याच्या गाडीवर पोलिसांचा छापा, १४ लाख ३४ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी : दि ३१ मे
जामखेड शहरानजीक असलेल्या लोहारदेवी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत एका टेम्पो मधील हिरा पान मसाला गुटख्याच्या गोण्या स्कार्पीओ गाडीमध्ये भरत असताना पोलीसांनी टाकलेल्या छाप्यात चौदा लाख चौतीस हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करत तीन आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. गुटका विक्रीवर बंदी असताना ईतका माल कुठून येतो याची चर्चा होताना दिसत आहे.

या बाबत सविस्तर असे की, काल दि. २९ मे रोजी रात्री आकरा वाजण्याच्या सुमारास जामखेड खर्डा रोडवरील लोहारदेवी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत यातील आरोपी असलेल्या राजू विठ्ठल शिंदे, मोहित सुभाष मिसाळ, योगेश सुखदेव खाडे यांनी विनोद छबू तोंडे याचे सांगण्यावरून व त्याचे आर्थिक फायद्या करिता मालवाहू टेम्पो नंबर MH २३ AU ४९१२ ही मधील हिरा पान मसाला गुटक्याचे गोण्या महिंद्रा स्कार्पियो ने नंबर MH १६ CJ ८०५५या गाडीमध्ये भरताना मिळून आले. त्यांचे ताब्यातून १४ लाख ३४ हजार रूपये किमतीचे वरील दोन वाहने व गुटखा, पानमसाला व तंबाखू हा महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंध असलेला व शारीरिक अपायकारक होईल असा गुटखा खाण्यास विक्री करण्याचे उद्देशाने बाळगून दुसऱ्या गाडीमध्ये भरताना मिळून आले आहे.

यानुसार फिर्यादी स्थानीक गुन्हे शाखा अहमदनगरचे पोलीस काॅन्स्टेबल रणजीत पोपट जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू विठ्ठल शिंदे (वय ३०) रा. चौसाळा ता. जि. बीड, मोहित सुभाष मिसाळ (वय १९) व योगेश सुखदेव खाडे (वय १९) दोघेही रा. आनंदवाडी ता. जामखेड व विनोद छबू तोंडे रा. बीड रोड जामखेड, यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here