पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या पूर्वसंध्येला जन्मस्थळ चौंडी येथे आमदार रोहित पवार यांच्याकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील चोंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार रोहित पवार यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध नद्यांच्या व बारवांच्या पवित्र तीर्थाने जलाभिषेक करण्यात येणार असून महापूजा व कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

३० तारखेला रात्री ९ वाजल्यासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात आले असून देशभरातून चौंडी येथे येणाऱ्या नागरिकांची राहण्याची व ३१ तारखेला दिवसभर महाप्रसाद वितरणाची देखील उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here