

जामखेड शहरातील मुख्य वीजवाहीनीला चिटकून नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील जुन्या डी. जे हॉटेल च्या पाठीमागील भागात एका नऊ वर्षाच्या मुलीचा घरावरुन गेलेल्या मुख्य वीजवाहीनीच्या तारेला चिटकून मुत्यू झाला. या घटनेमुळे परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच या ठीकाणी अरुंद आसलेल्या रस्त्यावरुन गेलेली मुख्य वीजवाहीनी ही शहरा बाहेरुन घेण्यात यावी अशी मागणी परीसरातील नागरिक करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जामखेड शहरातील जुन्या डी. जे हॉटेलच्या पाठीमागील भागात रहाणार्या नागरिकांच्या घरावरुन भुतवडा रोडकडे मेनलाईन गेलेली आहे. याच भागात काल दि 26 रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ओमी म्हसकर, वय. ९ वर्षे. रा.वरकुटे. ता. करमाळा. जिल्हा सोलापूर ही नऊ वर्षाची मुलगी घराच्या स्लॉपवर खेळत होती. या वेळी अचानक तीला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईन च्या तारेचा धक्का बसला तशी ती मुलगी स्लॉपवरुन खाली पडल्याने गंभीर जखमी झाली होती.

यानंतर ही घटना शेजारी रहाणारे संतोष घोलप व राहुल पवार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तातडीने सदर मुलीस गाडीवरुन शहरातील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. मात्र उपचार सुरू असतानाच तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओमी म्हसकर ही मुलगी सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा तालुक्यातील वरकुटे गावची रहीवासी आहे. ती कालच जामखेड येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नानिमित्त आपल्या आईसोबत आली होती. मात्र या लाईटच्या मेनलाईन मुळे तीचा मृत्यू झाला आसल्याने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती समजताच घटना घडली त्या ठिकाणी जामखेड महावितरण विभागाचे अधिकारी योगेश कासलीवाल यांनी भेट दिली. तसेच मयत मुलीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळवुन देण्याचा प्रयत्न करु आसे सांगितले. जामखेड शहरातुन गेलेल्या सर्व मुख्य वीजवाहीनीला नविन प्लास्टिक कोटेड केबल टाळण्यासाठी वरीष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळताच या ठीकाणी आसलेल्या तारा बदलण्यात येतील आशी माहिती दिली.

डी. जे. हॉटेल च्या पाठीमागून भुतवडा रस्त्याने मोठी वाहनांची वर्दळ असते. आनेक वेळा या रस्त्यावर मेनलाईन च्या तारा तुटुन दुर्घटना झाल्या आहेत. त्यामुळे घटना घडली या ठीकाणी गेलेली मेनलाईन काढुन दुसर्या मार्गाने टाकण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.


