

तेलंगशी येथील दिघोळ रोड ते मुळे वस्ती येथे शासकीय योजनेतून केलेला पानंद रस्ता गायब झाला.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथिल दिघोळ रोड ते मुळे वस्ती येथिल शासकीय योजनेतून केलेला पानंद रस्ता गायब झाला आहे. अज्ञात व्यक्तीने जेसीबी च्या सहाय्याने खोदल्याने हा रस्ता कायमस्वरूपी बंद झाला आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा खुला करावा व संबंधित रस्त्यामध्ये अडथळा निर्माण करणार्यावर कारवाई करावी अशी मागणी ॲड अरुण जाधव सह ग्रामस्थांनी केली आहे.

जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथिल येथिल जानेमाळ वस्ती येथे गावकऱ्यांच्या येण्याजाण्यासाठी 09/05/2022 रोजी पानंद रस्ता तयार करण्यात आला होता. त्याला शासनाने चांगल्या पद्धतीने निधी वापरला होता परंतु 20/04/2023 रोजी पूर्वी पासून चा हा रस्ता लोकांच्या येण्या जाण्यासाठी तयार केला होता. परंतु हा रस्ता अज्ञात व्यक्तीने तो रस्ता जेसीबी च्या साह्यानं तो निकामी केला त्यामुळे गावकरी, शाळेतील विद्यार्थी यांची येण्या जाण्या साठी रस्ता हा कायम बंद झाला आहे. रात्री बे रात्री अडचण आल्यास शेतकऱ्याला जाण्यासाठी रस्ता नाही. दळण वळण ची सुविधा या रस्त्यावरून होत होती. पण हा रस्ता बंद झाल्याने वस्ती व गावाचा, तालुक्याचा ,बाजाराचा,आरोग्य शिक्षण या सर्व गोष्टी रस्ताचा संपर्क तुटल्या मुळे गावकऱ्यांनी आपली अडचण व्यथा लेखी स्वरूपात मांडली आहे. जर आमचा पूर्वीचा रस्ता मिळाला नाही. तर आम्ही जामखेड येथे सर्व कुटुंब घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलनं उभे करू तहसीलदार योगेशजी चंद्रे व गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी गायब झालेल्या रस्ता परत द्यावा व येण्या जाण्यासाठी हा रस्ता खुला करावा आणि ज्या व्यक्तिने रस्त्यामध्ये अडथळा निमार्ण करत आहे. त्यांच्या वर कारवाही करावी आशी मागणी करण्यात आली आहे.


ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव, पै.सूरज पवार, विकास मासाळ, बापूसाहेब ओहोळ, नितीन ढाळे, महादेव गटकळ, लक्ष्मण जायभाय बाबासाहेब जायभाय, सागर रीटे, दत्तात्रय ढाळे, गंगाराम ढाळे, सुनील ढाळे, बाजीराव ढाळे, लक्ष्मण ढाळे, रघुनाथ ढाळे, विठ्ठल ढाळे, महोन ढाळे, अशोक ढाळे, सुग्रीव जायभाय, इतर ५० शेतकरी यांनी जामखेड तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.







