

आ.रोहित पवार आक्रमक… मतदारसंघातील मंजुर एमआयडीसी ची अधिसूचना जारी करा, अन्यथा युवकांना घेऊन उपोषणस बसण्याचा दिला इशारा
मुंबई : कर्जत व जामखेड तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी वरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोन्ही तालुक्यांसाठी महत्त्वाच्या असेलल्या या एमआयडीसीबद्दल शिंदे सरकारने अद्याप अधिसूचना जारी केली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत सरकारलं फटकारलं आहे. यावेळी मतदारसंघातील लोकांसाठी उपोषण करण्याचा इशाराही पवारांनीही दिली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारकडे वारंवार पाठपुरावा करुनही कर्जत-जामखेड एमआयडीसीबद्दल अधिसूचना काढली जात नाही. यावरुन रोहित पवार यांनी स्मरणपत्र आणि फोटो पोस्ट करत ट्विट केलं आहे. पवार म्हणाले, की “वारंवार स्मरणपत्र देऊनही राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीची अधिसूचना सरकार काढत नाही. त्यामुळं स्मरणशक्ती वाढावी म्हणून सरकारला च्यवनप्राश देण्याची आणि प्रसंगी माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसाठी उपोषण करण्याचीही माझी तयारी आहे.” आसे देखील ते म्हणाले.

या नंतर माध्यमांशी बोलताना आ. रोहित पवार यांनी सांगितले की कर्जत जामखेड मतदारसंघातील १२०० एकर जागेवर मंजुर आसलेल्या एम आय डी सी बाबत मुख्यमंत्री यांना भेटलो आहे. अधिवेशनात देखील मंत्री उदय सामंत यांनी अश्वासन दिले होते मात्र तरी देखील अद्याप कर्जत येथील एम आय डी सी बाबत अधिसूचना निघालेली नाही. त्यामुळे त्यांना विनंती केली आहे की ३१ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म माझ्या मतदारसंघात झाला आहे. त्यांच्या जयंतीच्या पुर्वी अधिसूचना काढावी तसेच संपुर्ण प्रक्रिया पुर्ण करुन २६ जुन २०२३ पुर्वी कर्जत जामखेड मतदारसंघातील मंजुर आसलेल्या एम आय डी सी ला फायनल मंजुरी द्यावी

अन्यथा जर याला मंजुरी दिली नाही तर संबंधित कार्यालयासमोर मी व माझ्या मतदारसंघातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपोषणास बसणार आहोत तसेच फायनल मंजुरी जो पर्यंत मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा आ. रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे. त्यामुळे भविष्यात पवार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील संघर्ष वाढू शकतो.







