विहिरीत बुडून जामखेड शहरातील २३ वर्षीय तरूणाचा मृत्यू

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील विठ्ठल मंदिरा समोर राहणाऱ्या प्रथमेश प्रशांतचंद्र भोसले या २३ वर्षे या तरूणाचा विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. जामखेड येथिल नागेश विद्यालयात ग्रंथपाल असणारे प्रशांतचंद्र महादेव भोसले (सर) यांचा तो मुलगा होता.

याबाबत सविस्तर असे की, जामखेड येथिल नागेश विद्यालयात ग्रंथपाल असणारे प्रशांतचंद्र महादेव भोसले हे मयत मुलगा प्रथमेशला सोबत घेऊन जामखेड करमाळा रोडलगत आसलेल्या आयटीआय कॉलेज समोर जामखेड येथे असलेल्या आपल्या शेतात दि. १६ मे रोजी दुपारी जणावरांसाठी मका आणण्यासाठी गेले होते. त्यानंतर शेतातील मका कापून त्याचे भारे तयार करून ठेवले . सायंकाळच्या सुमारास मयत प्रथमेश हा आमचे मकाचा भारा घेवून त्याच शेताच्या कडेला असलेल्या जनावरांचे गोठ्यात ठेवून येतो असे सांगुन शेतातुन मकाचा भारा घेवुन गेला होता.

परंतु त्यानंतर बराच वेळ झाला तरी मुलगा प्रथमेश हा आमचे जवळ शेतात आला नाही म्हणुन मुलाच्या आई वडीलांनी प्रथमेश याचा आजुबाजुचे परिसरात शोध घेतला परंतु तो कोठेही मिळून आला नाही. त्यावरून प्रथमेश हा मिसींग झाला म्हणून जामखेड पोलीस स्टेशनला मिसींग नोंद करण्यात आली होती.

मात्र काल दि १७ मे रोजी त्याचा मृतदेह शेतातील विहीरत आढळून आला त्यानुसार मयत प्रथमेश याचे मामा विजय रावसाहेब काळदाते यांनी दिलेल्या खबरीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोखंडे व पोलीस नाईक अजय साठे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here