जामखेड तालुक्यातील महीलेने अडवले ट्रक चालकास “हॅनीट्रॅप” च्या जाळ्यात, महीलेसह एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी

फेसबुक च्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन महीलेने ओळख निर्माण करुन ट्रक चालकास आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर आपल्या गावी घरी बोलवुन पैशाची मागणी केली. तसेच पैसै दिले नाहीत तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर पिडीत ट्रक चालकाच्या फीर्यादी वरुन जामखेड पोलीस स्टेशनला महीलेसह एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांना कडुन मिळालेली माहिती अशी की जामखेड तालुक्यातील चोबेवाडी येथिल एका महिलेने आपल्या नातेवाईकांशी संगनमत करून लातूर जिल्ह्य़ातील अहमदपूर तालुक्यातील एका ट्रक चालकास फेसबुकवर फ्रेंन्ड करून रिक्वेस्ट पाठवली. व आपला फोन नंबर देवून प्रेमाच्या गप्पा मारण्यास सुरवात केली. व आपल्या घरी बोलावून सदर ट्रक ड्रायव्हरला लाठी-काठीने मारहाण करुन पैशाची मागणी केली. तसेच त्या महिलेसोबत अर्धनग्न अवस्थेत व जबरदस्तीने फोटो काढले. व पैसे दिले नाही तर बलात्काराची खोटी तक्रार दाखल करील अशी धमकी दिली. त्यामुळे ड्रायव्हरने घाबरुन आरोपींना काही पैसे दिले. मात्र त्यांची पैशाची भुक वाढल्याने ड्रायव्हर यांची पत्नी व इतर नातेवाईक यांना ड्रायव्हरचेच मोबाईल वरुन फोन करुन पैशाची मागणी करीत होते.

दरम्यान सदर पिडित ड्रायव्हरच्या पत्नी हिने डायल ११२ नंबरवर कॉल केल्याने पोलीसांनी ड्रायव्हरच्या मोबाईल लोकेशन वरुन शोध घेतला व सविस्तर चौकशी करुन ड्रायव्हरचे तक्रारीवरुन सदर महिला व तिचे नातेवाईक यांचे विरुध्द अन्यायाने कैदेत ठेवणे, खंडणी व दुखापतीचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक केली असुन इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. जामखेड तालुक्यात पहिल्यांदाच हनीट्रॅपचे प्रकरण घडल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे. तर या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावून हॅनीट्रॅप उघड केल्याबद्दल जामखेड पोलीसांचे जनतेतून मोठे कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर असे की यातील फिर्यादी व आरोपी यांची फेसबुकवर ओळखून यातील आरोपीत क्रमांक तीन हिने सामाजिक माध्यमाद्वारे फेसबुक फिर्यादी सोबत बोलून तिचा मोबाईल क्रमांक देऊन जामखेड तालुक्यातील नान्नज येथे बोलावून घेतले. यानंतर चोबेवाडी गावच्या शिवारात राहते घरी घेऊन गेली तेथे फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करत काठीने मरण केली त्यानंतर फिर्यादीचे पत्नीस फिर्यादीचे फोनवरून फोन करून दोन लाख रुपयांची मागणी करून तुम्ही आम्हाला दोन लाख रुपये द्या नाहीतर आम्ही फिर्यादीस जीवे ठार मारून टाकू तसेच आमच्याकडे काढलेले फिर्यादीची फोटो व्हायरल करू नाहीतर त्याचे विरुद्ध बलात्काराची खोटी केस करू असे म्हणाल्याने फिर्यादीने त्यांच्याकडील एक हजार रुपये रोख रक्कम दिली तसेच बाकी पैसे देतो असे म्हणून आरोपीत मजकूर यांनी फिर्यादीस त्यांचे घरामध्ये अनाधिकृत डांबून ठेवून त्याचे बळजबरीने कपडे काढून त्याचे अर्ध नग्न अवस्थेत फोटो काढले आहेत.

यानुसार फिर्यादी शरद बालाजी पाटील (वय ३५) , धंदा ड्रायव्हर, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी १) नितीन चंदन काळे २) सचिन काळे ३) सारिका काळे ४) किरण काळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ११ मे ते दि. १२ मे च्या दरम्यान जामखेड तालुक्यातील चोबेवाडी येथे घडली आहे. सदर गुन्ह्याचा तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी भोस हे करत आहेत.

सदरची कारवाई हि श्री. महेश पाटील पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती व जामखेड पोलीस स्टेशनच्या कर्मचारी यांचे पथकाने मा. प्रशांत खैरे, अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा. श्री. आण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.

चौकट..

अशा प्रकारचे हनीट्रॅप मध्ये कोणी अडकले असल्यास न घाबरता पोलीसांत तक्रार नोंद करावी. जामखेड पोलीसांच्या वतीने त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल असे आव्हान जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here