तात्यासाहेब जरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना खाऊ व जनावरांना चारा वाटप

जामखेड प्रतिनिधी

अनावश्यक खर्चाला फटा देत जामखेड येथिल आनुष्का मेडिकल चे संचालक तात्या साहेब जरे यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील मुलांना खाऊ वाटप व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संचलित साकेश्वर गोशाळेमध्ये आपली सामाजिक बांधिलकी गोवंश जतन व संवर्धन करण्याकरिता मोफत हिरवा चारा वाटप करण्यात आला.

सध्या मोठा गाजावाजा करत व डी जे च्या तालावर नाचत धांगडधिंगा होत आसताना आपण वाढदिवसा मध्ये पहात आहोत. नाहक पैशांचा चुराडा होत आहे. मात्र जामखेड येथे एक वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचे उदाहरण नुकतेच पहावयास मिळाले आहे. जामखेड येथिल आनुष्का मेडिकल चे संचालक तात्या साहेब जरे यांनी आपला एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला आहे. प्रथम जामखेड येथिल निवारा बालगृहातील मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसुन येत होता. खाऊ वाटपादरम्यान केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष तात्याराम बांदल, दादासाहेब मोहिते सर, अमोल कसाब सर प्रदीप भोंडवे सर विकास जाधव प्रज्वल राळेभात सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

दुसर्‍या दिवशी साकेश्वर येथिल शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संचलित साकेश्वर गोशाळेमध्ये तात्यासाहेब जरे यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपुन गोवंश जतन व संवर्धन करण्याकरिता मोफत हिरवा चारा वाटप करण्यात आला. तात्यासाहेब जरे यांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गोशाळेला चारा देणे या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष पांडुरंग भोसले , अनुष्का मेडिकलचे संचालक तात्यासाहेब अर्जुन जरे, साकत चे ग्रामपंचायत सदस्य महादेव वराट सर, पोलीस पाटील डॉक्टर महादेव वराट, सुदाम वराट सह आधी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here