

जामखेड येथील गाजलेल्या विशाल सुर्वे खुनप्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील नियुक्त
प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला होता नवऱ्याचा खुन
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या मंदिराजवळ दिनांक 13 मे 2022 रोजी विशाल सुर्वे याचा टेम्पो अडवून अतिशय निर्घृणपणे त्याचा खून करण्यात आला होता. आपला नवरा अनैतिक संबंधाला अडथळा ठरत आसल्याने या गुन्ह्यातील मयताची पत्नी व तीचा प्रियकर व त्याच्या मित्राने हा खुन केला आसल्याचे निष्पन्न झाले होते.

या प्रकरणामुळे संपूर्ण जामखेड तालुका हादरला होता.या प्रकरणी त्या वेळी आसलेले जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सह त्यांच्या टीम ने जलद कृती करून या प्रकरणातील आरोपी कृष्णा सुर्वे, श्रीधर कान्हेरकर आणि मयताची पत्नी पूजा सुर्वे यांना अटक करण्यात आले होते.आरोपी कृष्णा आणि पूजा यांच्या अनैतिक प्रेमप्रकरणातून हा खून घडल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.

दरम्यान,या घृणास्पद खुनाची व्याप्ती लक्षात घेऊन मयताचे नातेवाईक यांनी या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून मुंबईतील ख्यातनाम वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची नेमणूक करावी अशी मागणी केली होती.या प्रकरणाची व्याप्ती पाहून महाराष्ट्राच्या गृहविभागाने नुकताच त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला.

या प्रकरणी न्यायालयाने आरोपविरुद्ध आरोप निश्चित केले असून या प्रकरणाची लवकरच नियमित सुनावणी होणार असल्याचे यादव-पाटील यांनी स्पष्ट केले. यादव-पाटील यांच्या नियुक्तीबद्दल ग्रामस्थानीं शासनाचे आभार व्यक्त करून मयताच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
नेमके काय होते प्रकरण
मयत विशाल सुर्वे याची पत्नी व त्यांच्या नात्यातील आरोपी कृष्णा संजय सुर्वै या दोघांचे अनैतिक संबंध होते. मात्र या अनैतिक संबंधाला मयत विशाल सुर्वे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्यासाठी आरोपीची पत्नी हीने कट रचला होता. मयत विशाल सुर्वे हा त्या दिवशी काम आटोपून आपल्या घरी येत असताना विशाल ची पत्नी ही मोबाईलच्या माध्यमातून पतीच्या संपर्कात होती. मयत विशाल हा आपली रीक्षा घेऊन येत होता. त्यावेळी त्यांच्या खर्डा येथील सुर्वे वस्तीकडे जात आसताना लक्ष्मीआई मंदिराजवळ मयत विशाल ची गाडी आली या वेळी आरोपी कृष्णा सुर्वे रा सुर्वे वस्ती, खर्डा व त्याचा मित्र श्रीधर राम कन्हेरकर वय २७ रा. खर्डा शिवार याच्या मदतीने विशाल याच्या डोक्यावर टणक वस्तूने मारहाण केली. या मारहाणीत विशाल याचा जाग्यावरच मुत्यू झाला होता.







