एम डी बालरोग तज्ज्ञांच्या योग्य उपचारामुळे मिळाले चिमुकलीस जीवदान

ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाच्या वतीने चिमुकलीस पोषाख परिधान करून दिला डीसर्चाज

जामखेड : जामखेड शहरातील बीड रोडवर नव्याने सुरू झालेल्या ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाच्या एम डी बालरोग तज्ज्ञ डॉ आर. एस राठोड यांनी एका चिमुकलीवर योग्य उपचार मिळाल्याने तीला जिवनदान मिळाले आहे. विशेष म्हणजे अगदी अल्पदरात सेवा देऊन हॉस्पिटल च्या वतीने या चिमुकलीस पोषाख परिधान करून डीसर्चाज देण्यात आला.

जामखेड तालुक्यातील साकत परीसरात रहाणार्‍या अश्विनी बाळु तावरे या बालकास पोटाचा गंभीर अजार झाल्याने तीला तातडीने आठ ते दहा दिवसांपुर्वी अहमदनगर येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मित्र अजार गंभीर आसल्याने नगरच्या डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकास या चिमुकलीस तातडीने पुणे येथील मोठ्या हॉस्पिटल मधे घेऊन जाण्यास सांगितले मात्र घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आसल्याने त्या चिमुकलीस पुन्हा जामखेड येथे आणण्यात आले होते.

यावेळी त्यांना शहरातील नवीन झालेल्या ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयात एम डी बालरोग तज्ज्ञ डॉ आर एस राठोड यांची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी तातडीने जामखेड च्या ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयात दाखल केले. यावेळी चिमुकलीची प्रकृती चिंताजनक आसुनही डॉक्टरांनी तीच्यावर पाच ते सहा दिवस योग्य उपचार केल्याने तीच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली.

विषेश म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांची परीस्थिती अतिशय हलाखीची आसल्याने अतिशय अल्पदरात दरात या चिमुकलीवर उपचार करण्यात आले. अजारी आसलेल्या चिमुकलीच्या आई वडीलांनी चिमुकलीवर उपचार होणे अवघड वाटत आसल्याने आशा सोडली होती मात्र डॉ आर एस राठोड हे देवदूता सारखे धाऊन आले व आमच्या मुलीवर योग्य उपचार केल्याने तीला जिवनदान मिळाले अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईने बोलताना दिली.

पैशा पेक्षा चिमुकल्या मुलीवर योग्य उपचार मिळाल्याने ती ठणठणीत झाली. त्या मुळे आम्हाला योग्य समाधान वाटत आहे. तसेच अतिशय अल्प दरात मुलीवर उपचार केले आहेत. त्यामुळे एक माणुसकी या नात्याने चिमुकल्या मुलीस आम्ही नवीन कपडे परीधान करुन तीला डीसर्चाज देण्यात आला आहे. तसेच अतिशय गरीब कुटुंबातील बाल रुग्णांवर आम्ही अल्पदरात उपचार करणार आसल्याची माहिती ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाचे संचालक संदिप ठोंबरे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here