

महाआरोग्य शिबिरात १५७ रुग्णांनी घेतले मोफत उपचार, गोशाळेस वाटला मोफत चारा
जामखेड प्रतिनिधी
समर्थ हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त जामखेड येथे महाआरोग्य शिबिर व साकेश्वर येथिल गोशाळेतील गोमातांना मोफत हीरवा चारा वाटप करण्यात आला. घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात १५७ गरजु लोकांनी लाभ घेतला.

आरोग्य सेवे सोबतच समाजसेवेचा वसा घेतलेल्या शहरातील समर्थ हॉस्पिटल चे संचालक डॉ भरत दारकुंडे यांनी आपल्या हॉस्पिटल च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त महाआरोग्य शिबिर बरोबरच साकेश्वर येथिल गोशाळेतील गोमातांना मोफत हीरवा चारा वाटप करण्यात आला होता.

या वेळी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की काही घटना घडल्या तर पोलीस स्टेशनला सर्मथ हॉस्पिटल च्या एम एल सी येतात त्यावरुन सर्मथ हॉस्पिटल काम लक्षात येत आहे. या हॉस्पिटल मध्ये रुग्णांना अल्प दरात सेवा मिळते ही फार कैतुकास्पद गोष्ट आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले की डॉ भरत दारकुंडे यांचे कोरोना काळात खुप मोठे योगदान आहे. तसेच त्यांनी रुग्णांना मोफत जेवणाची सोय केली आहे त्यावरुन डॉक्टरांचे सामाजिक काम दिसुन येत आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील तर उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या हस्ते झाले. या वेळी लहु शिंदे सागर सदाफुले अमोल शिंदे उमेश ढगे गणेश उबाळे संजय काशिद पांडुराजे भोसले अभिजित राळेभात उत्कर्ष कुलकर्णी गणेश जोशी मयुर भोसले भाऊ पोटफोडे सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनानंतर या शिबिरात डॉक्टर अमोल भगत एम.डी. मेडिसिन हृदयरोग व मधुमेह तज्ञ, डॉक्टर आशा भगत एम.बी.बी.एस. डी.जी. ओ.स्री रोग तज्ञ, डॉक्टर अर्जुन शेळके अस्थिरोग तज्ञ, डॉक्टर भरत दारकुंडे संचालक, डॉक्टर सोनाली दारकुंडे संचालक समर्थ हॉस्पिटल जामखेड यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. या मध्ये एकुण १५७ गरजु लोकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घेतला. सायंकाळी साकत परीसरातील साकेश्वर गोशाळेतील गोमातांना मोफत हीरवा चारा वाटप करण्यात आला.







