होमिओपॅथिक ही सर्वात प्रभावी उपचार पद्धती-डॉ.भास्कर मोरे

जामखेड प्रतिनिधी

वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन संशोधनामुळे कॅन्सर सारख्या असाध्य रोगांवर देखील प्रभावीपणे उपचार केले जात आहेत. होमिओपॅथिक उपचार पद्धती ही सर्वात प्रभावी उपचार पद्धती असुन अश्विनी हॉस्पिटलच्या माध्यमातून खर्डा व परीसरातील रुग्णांना निश्चित प्रभावी उपचार मिळतील असे गौरवोद्गार रत्नदीप मेडिकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.भास्कर मोरे पाटील यांनी काढले.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे अश्विनी हॉस्पिटलचा शुभारंभ डॉ.भास्कर मोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. भास्कर मोरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेशराव भोसले, कॉंग्रेस नेत्या ज्यातीताई गोलेकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री.विजयसिंह गोलेकर, दत्तराज पवार, अश्विनी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. सौ. अश्विनी गुरूदत साबळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. भास्कर मोरे पाटील म्हणाले की महात्मा फुले जीवनदायी योजनेत गरजु व पात्र रूग्णांवर अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात. त्याचा सर्व रूग्णांनी लाभ घेतला पाहिजे. महात्मा फुले जीवनदायी योजनेची घरोघरी माहिती झाली पाहिजे. त्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वांनी पुढाकार घेऊन सर्व सामान्यांना या योजनेचा लाभ मिळवून दिला पाहिजे.

यावेळी डॉ. भास्कर मोरे पाटील यांच्या सह सुरेश भोसले, ज्योती ताई गोलेकर, विजयसिंह गोलेकर आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेडिकलचे संचालक श्री. गुरूदत साबळे यांनी केले तर आभार डॉ. अश्विनी साबळे यांनी मानले.

चौकट

होमिओपॅथिक उपचार पद्धती ही औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नसलेली संपुर्ण जग मान्य एकमेव उपचार पद्धती आहे. दिवसेंदिवस होमिओपॅथिक उपचार पद्धतीकडे रुग्णालयांचा कल वाढतो आहे.होमिओपॅथीमध्ये मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले असुन त्याचा रुग्णालयांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.भास्कर मोरे पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here