

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
रक्तदान शिबिराचे यावर्षी चे तीसरे वर्ष
जामखेड प्रतिनिधी
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा पाहता त्या वेळी आसलेले जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मागील वर्षी दि. १ मे रोजी तालुक्यातील अनेक ठिकाणी एकाच वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेक रक्त दात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले होते.

त्यानुसारच यावेळी ही माझे जामखेड, माझी जबाबदारी या सदराखाली दि. १ मे २०२३ महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले असून सोमवार दि .०१ मे २०२२ रोजी सकाळी ९ .३० ते ०५.०० वा . पर्यंत जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन या ठीकाणी रक्तदात्यांना आपले रक्तदान करता येणार आहे. यावेळी जामखेड तालुक्यातील सर्वच पत्रकारांच्या वतीने देखील तालुक्यातील जास्तीत जास्त तरूणांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.






