

दिघोळ येथे शेतात काम करीत आसलेल्या शेतकर्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू
जामखेड प्रतिनिधी, दि 28 जामखेड तालुक्यातील दिघोळ या ठीकाणी आज सकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतात काम करीत आसलेले शेतकरी भिमराव बाजीराव दगडे यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बदलत्या हवामानानुसार सध्या राज्यात ठिकठिकाणी गारपिटीसह हलका ते मध्यम पाऊस होत आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात आगामी पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. याचाच फटका अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्याला देखील बसला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जामखेड तालुक्यातील दिघोळ येथे आज दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास अचानक वादळ व गारांचा पाऊस सुरू झाला. दरम्यान काही समजण्याच्या आतच आपल्या दिघोळ परीसरातील बाम्हणवाडी रोडवरील गट नंबर २३ मधील शेतात गुरे चारत असताना व त्यांच्यासाठी घास कापत असलेल्या ६५ वर्षीय शेतकरी भिमराव बाजीराव दगडे रा. दिघोळ यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
ही घटना समजताच दिघोळचे सरपंच नानासाहेब गिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सदर ठिकाण जाऊन मयत भिमराव बाजीराव दगडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला आहे. तर महसूल विभागाच्या वतीने सदर घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे.








