

ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य व सेवा चांगली होणार – पांडुरंग (देवा) देशमुख
जामखेड शहरात नव्याने ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाचे उद्घाटन संपन्न, २४ तास एम डी बालरोग तज्ज्ञ उपलब्ध
जामखेड प्रतिनिधी, दि २२ एप्रिल जामखेड सारख्या ठिकाणी प्रथमच एम डी बालरोग तज्ज्ञ या हॉस्पिटल च्या माध्यमातून उपलब्ध होणार आसल्याने रुग्णांना आता नगर पुणे याठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाच्या माध्यमातून आता बालकांची आरोग्य व सेवा चांगली होण्यास मदत होणार आहे आसे मत सौताडा येथिल पांडुरंग (देवा) देशमुख यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

जामखेड तालुक्यात प्रथमच बाल रुग्णाच्या सेवेत एम डी बालरोग तज्ज्ञ आसलेल्या ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाचे उद्घाटन दि २२ एप्रिल रोजी सकाळी सौताडा येथिल पांडुरंग (देवा) देशमुख व सौ. वच्छला व श्री त्रिंबक सखाराम ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले.

या वेळी डॉक्टर्स असोसिएशन जामखेड, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन जामखेड व जामखेड तालुका लॅब असोसिएशन जामखेड चे सर्वच मान्यवर व मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. या बाल रुग्णालयामध्ये सुसज्ज बाह्य रुग्ण विभाग, २४ तास आंतर रुग्ण विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, ३० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल, नवजात बालकांची कावीळ कमी करणे मशीन, लहान मुलांच्या सर्व प्रकारच्या रुटीन व स्पेशल लसीकरणाची सोय, सर्व आजारांवर उपचार व मार्गदर्शन , लहान मुलांच्या झटके व आकडी यावर उपचार व मार्गदर्शन, अस्थमा क्लिनिक, लहान मुलांच्या श्वसनाचे आजार, वाफ देणे, बालदमा यावर उपचार व मार्गदर्शन, न्यूरो डेव्हलपमेंट क्लीनिक, गतिमंद, मतिमंद, चंचलपणा यावर उपचार मार्गदर्शन आदी सेवा 24 तास पुरवली जाणार आहेत आशी माहिती ओम हॉस्पिटल बाल रुग्णालयाचे संचालक संदिप ठोंबरे, ॲड महेश वारे व ओम फॉर्मा चे सचिन ठोंबरे यांनी दिली.







