जामखेड तालुक्यात एकाच दिवशी दोघांची गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी :जामखेड शहरातील प्रशांत नेटके या ३४ वर्षीय अविवाहित तरूणाने जमदारवाडी येथिल शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसरी घटना आरणगाव येथील नवनाथ योगिराज कारंडे यांनी शेतातील बोरीच्या झाडाला केबलच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. जामखेड तालुक्यात एका दिवसात दोन आत्महत्याच्या घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पहीली घटना ही जामखेड शहरातील रमेश खाडे नगर येथे राहणाऱ्या प्रशांत बाळासाहेब नेटके या ३४ वर्षीय तरूणाने रात्रीच्या सुमारास जमादारवाडी शिवारातील आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जमादारवाडी व जामखेड परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

जामखेड येथील जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन अंतिम संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची खबर आशोक दत्तु नेटके यांनी दिली असून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत हे पुढील तपास करत आहेत.

दुसरी घटना जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील कारंडे वस्ती या ठीकाणी घडली आहे. कारंडे वस्ती येथिल मयत नवनाथ योगिराज कारंडे (वय ४७), या इसमाने कवडगाव शिवारात म्हसोबाचे शेतात खबर देणारे यांच्या बोरीच्या झाडाला केबलच्या सहाय्याने १७ एप्रिल रोजी १२:४५ वाजताचे पुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

सदर घटनेची खबर योगिराज भानुदास कारंडे ६५ यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुक्तार कुरेशी हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here