

मोहा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महादेव देडे तर व्हा.चेअरमनपदी महादेव बांगर यांची बिनविरोध निवड
जामखेड प्रतिनिधी :१७ एप्रिल मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी महादेव देडे तर व्हा.चेअरमनपदी महादेव बांगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल अहमदनगर जिल्हा बँकेच्या सभागृहात बँकेचे संचालक अमोल राळेभात यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात व सुधीर राळेभात यांच्या हस्ते चेअरमन, व्हा.चेअरमन तसेच सर्व संचालकांचा यथोचित करण्यात सत्कार आला.

मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची सन २०२२-२३ ते २०२७-२८ सालाकरिताची चेअरमन व व्हा.चेअरमनपदाची व सर्व संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडी पार पडल्या. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी देवीचंद डोंगरे, शिवाजी डोंगरे, भीमराव कापसे, ज्ञानदेव बांगर, वामन डोंगरे, पंडित गायकवाड, तुकाराम चौधरी, तुकाराम डोके, पांडुरंग देडे, उत्तम गायकवाड, मारुती डोंगरे, मारुती बेलेकर, गोरख चौधरी, विकास सांगळे, विनोद इंगळे यांनी सहकार्य केले.

नवनिर्वाचित संचालक..
संभाजी चौधरी, महादेव देडे, रावसाहेब रेडे, भाऊसाहेब अडाले, बाबासाहेब इंगळे, किसन देडे, महादेव रेडे, भास्कर बांगर, सुशिला बाबासाहेब डोंगरे, आशाबाई शहाजी रेडे, अमोल राळेभात, महादेव बांगर, सुदाम नवगिरे.
मोहा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची मागील ५ वर्षापासून बँक पातळीवर १०० % वसुली होत आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत या संस्थेच्या ८२ सभासदांना ४०६४३५४/- रकमेची कर्जमाफी मिळाली असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या १४९ सभासदांना ५३७५८७५/- प्रोत्साहन रक्कम मिळालेली आहे.







