जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बरखास्त संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करा-विलास साठे

अहमदनगर : जामखेड तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य शिक्षण संस्थेचा कारभार गेली वीस वर्षे बोगस संचालक मंडळ करत असून २००१ नंतर एकही बदल अर्ज मंजूर नसताना हे संचालक मंडळ कार्यरत आहे. २००१ नंतर एकदाही धर्मदाय आयुक्तांची परवानगी घेतली नाही व अनेकदा नोटीसा काढूनही सध्याचे कारभारी एकही कागदोपत्री पुरावा सादर करु शकले नाहीत. त्यामुळे जामखेड पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या बरखास्त संचालक मंडळाच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी आशी मागणी तक्रारदार विलास साठे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परीषदेत केली आहे.

पत्रकार परीषदेत विलास साठे बोलताना यांनी सांगितले की धक्कादायक बाब म्हणजे संस्था कार्यालयात कोणतेही अधिकृत दप्तर नाही. त्यामुळे वीस वर्षे हे संचालक मंडळ कोणत्या अधिकाराने काम करत होते व त्यांनी किती आर्थिक गैरव्यवहार केला, याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने करावा व संबंधितावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गृहशाखेच्या पोलीस उपअधीक्षकांकडे अहमदनगर येथील विलास साठे यांनी केली आहे.
आहे. विलास साठे पाटील यांनी ही तक्रार केली आहे. शिक्षण संस्थेचे २००१ पासूनचे बदल अर्ज दाखल होते. संस्थेचे तत्कालीन सचिव दिलीप बाफना यांना मनमानी पद्धतीने पदावरून दूर केले होते. त्यांनी सदर बदल अर्जास हरकत घेतली. अनेकदा संधी देऊन सध्याचे बोगस संचालक कागदपत्रे दाखल करू शकले नाहीत. त्यांच्याकडे कसलाच पुरावा नाही व धर्मदाय उपायुक्त अहमदनगर, यांनी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सर्व बदल अर्ज रद्द ठरवले आहेत. त्यामुळे आपोआपच संस्थेला संचालक मंडळ राहिलेले नाही. तरी देखील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव आपल्याच सहीने बँकेचे व्यवहार करत आहेत. या संस्थेचे सचिव साधे सदस्य सुद्धा नाहीत. तरी नोकरभरतींचे प्रस्ताव पाठवत आहेत.

त्याला सहसंचालक, उच्चशिक्षण यांनी स्थगिती दिली आहे. परंतु नोकरीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात व्यवहार सुरूच असल्याचा दावा तक्रारदार विलास साठे यांनी केला आहे. दरम्यान, नुकतेच दोन अनुकंपा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. हे गरजेचे असले तरी याबाबत आर्थिक व्यवहार होत आहेत, हे खेदजनक आहे. तसेच या नोकऱ्या पुढे अडचणीत येण्याचीच दाट शक्यता असेल. सर्व बँकांना पदाधिकाऱ्यांनाच्या सहीने व्यवहार
करू नये व याकाळात झालेल्या गैरव्यवहाराची माहिती मागितली आहे. त्यानंतर आपण स्वतः पोलीस ठाण्यात फिर्याद देणार असल्याची माहिती साठे यांनी दिली.

याबाबतच्या कारवाईला दिलीप बाफना यांनीही हरकत घेतल्याने हे प्रकरण न्याय प्रविष्ठ झाले आहे. याबाबत कोणाची फसवणूक होऊ नये, म्हणून तक्रार दिली असल्याचे समजते. प्राध्यापक व शिक्षक भरतीच्या नावाखाली एका
पतसंस्था कार्यालयात व सुवर्णपेढीतून अनेकदा व्यवहार झाल्याची चर्चा शहरात होत असते. लवकरच या प्रकरणाची चौकशी करून कारवाई पोलिसांनी कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here