पवित्र रमजान महिन्यानिमित्त प्रा. मधुकर राळेभात मित्रमंडळाच्या वतीने जामखेड येथे इफ्तार पार्टी संपन्न

सद्याच्या परिस्थितीत आज देश कोणत्या बाजूने चालला आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. हा विचार सामाजिकदृष्टय़ा खूप महत्वाचा आहे. हा विचार सुज्ञ व चांगल्या माणसांनी करण्याची गरज आहे. चांगली माणसं सर्व समाजात असतात. राजकारण सोडून समाजकारणाचा आपण विचार केला पाहिजे. देशात मतांसाठी धर्म, जात, पंथ यावर लोक एका बाजूला जाता कामा नयेत. चांगली समाज व्यवस्था टिकवण्यासाठी काम केले पाहिजे. असे मत प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, हिंदू धर्मात जसे आषाढी-कार्तिकी एकादशीच्या उपवासाचे पावित्र्य असते तसेच मुस्लिम धर्मात पवित्र रमजानाच्या उपवासाचे पावित्र्य असते. हे एक व्रतच असते. रमजानाच्या या महिन्यात जसे पवित्र व आनंदी वातावरण असते, तसेच वातावरण असावे अशीच अपेक्षा आहे.

व. रविवार दि. ९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात मित्र मंडळाच्या वतीने सद्या सुरू असलेल्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यानिमत्त जामखेड शहरातील खर्डा चौकातील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील, वंचीत बहुजन आघाडीचे नेते ॲड. डॉ. अरूण जाधव, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, जामखेड शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, नगरसेवक मोहन पवार, प्रकाश सदाफुले, मुस्लिम पंच कमिटीचे अजहर काझी, माजी ग्रामपंचायत सदस्य ईस्माईल सय्यद, शेरखान भाई, मुक्तार सय्यद, अमर कुरेशी, मंजर सय्यद, नरेंद्र जाधव, डॉ. कैलास हजारे, हैदर सुभेदार आदि मान्यवरांसह रोजेदार मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगरसेवक पवन राळेभात, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, साई टेलर, बिलाल शेख, ॲड. अमृत राळेभात यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाकीर शेख यांनी तर आभार इस्माईल सय्यद यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here