शेतकर्‍यांवर कांदा अनुदानासाठी होणाऱ्या अन्याय विरोध्दात राष्ट्रवादीचा उद्या तहसीलवर मोर्चा

जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामखेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे व कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर (आबा) राळेभात यांच्या वतीने शेतकरी बांधवांनवर कांदा अनुदानासाठी होणाऱ्या अन्याय
विरोधात उद्या सोमवार दि १० रोजी तहसिल कार्यलयावर भव्य मोर्चाचे काढण्यात येणार आहे.

जामखेड येथे शेतकऱ्यांच्या पट्या व पट्यांचे अहवाल घेण्यासाठी जामखेड बाजार समिती टाळाटाळ करत आहेत या कारणास्तव सोमवार दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी भव्य मोर्चाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने केले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन झहीर ट्रेडर्स व दत्त ट्रेडर्स तसेच इतर दुकाने यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने जामखेड पोलीस स्टेशन व तहसिल येथे निवेदन देण्यात आले आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी दि. १० एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता पंचायत समिती कार्यालयासमोर सर्व शेतकरी बांधवांनी मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवहान केले आहे.

निवेदन देतेवेळी जामखेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, मधुकर (आबा) राळेभात, संतोष निगुडे (सरपंच आरणगाव) , सुनील उबाळे सरपंच चौडी, हनुमंत पाटील, जहीर शेख, बाळासाहेब पवार, गणेश ढगे, संतोष गोरे, अनिल जाधव, कैलास घरत, प्रशांत शिंदे (जवळा सरपंच) आदी पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here