जामखेड येथिल जय गणेश फर्निचर दुकानास आग लागून सात लाखांचे साहित्य जळुन खाक

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल करमाळा रोडवरील जय गणेश फर्निचर या दुकानास आज सकाळी आग लागून अंदाजे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्यानंतर शेजारील दोन टँकर व नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाडीच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व लाकडी साहित्य व मिशनरी जळुन खाक झाल्या होत्या.

या बाबत अधिक माहिती अशी की जामखेड येथिल करमाळा रोडवरील आरोळे वस्ती या ठीकाणी दुकान मालक गणेश ज्ञानदेव सुतार यांचे जय गणेश फर्निचर नावाचे दुकान आहे. आज दि ८ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुकात अचानक लाईट चे शॉर्टसर्किट झाल्यामुळे दुकानातील रंधा मशिन, मोठे ड्रील मशिन, कटर मशिन, ग्रॅंन्डर मशिन, तसेच दुकानातील हार्डवेअर चे सामान साउंड बॉक्स, प्लाऊड, लाकडी चौकटी व दरवाज्यासह इतर साहित्य जळुन खाक झाले. या मध्ये अंदाजे एकुण सात लाख रुपयांचे नुकसान झाले आसल्याची माहिती दुकान मालक गणेश ज्ञानदेव सुतार यांनी दिली.

दुकानात आग लागल्याची माहिती शेजारी रहाणार्‍या लोकांना समजताच शेजारील विजय पोटफोडे व अमर आजबे यांच्या दोन टँकरने आग विझवण्यात आली. यानंतर बालाजी जरे यांनी नगरपरिषदेच्या आग्नीशामक दलाच्या गाडीस फोन लाऊन माहिती दिली यानंतर आग्नीशामक दलाच्या गाडीच्या
मदतीने देखील आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत दुकानातील सर्व मशनरी व लाकडी साहीत्य जळुन खाक झाले होते. लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आसल्याने शासनाकडून मदत मिळावी आशी मागणी दुकान मालक गणेश सुतार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here