जामखेड तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी ६ एप्रिल

जामखेड तालुक्यातील खर्डा परीसरातील दरडवाडी येथिल बाबासाहेब रामभाऊ दराडे, (वय-६३) या शेतकऱ्यांने कर्जबाजारी पणास कंटाळून आपल्या राहते घराचे लोखंडी पाईपला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे.

एकीकडे वाढलेला उत्पादन खर्च, ग्राहक म्हणून सोसावे लागणारे महागाईचे चटके, पडलेले बाजारभाव यांचा सामना करताना मेटाकुटीला आलेल्या राज्यातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाने जबरदस्त तडाखा दिला आहे. ढगांच्या गडगडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी चिंतातुर झाला आसताच दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या होण्याचे सत्र सुरूच आहे.


जामखेड तालुक्यात देखील एका शेतकर्‍यांने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याबाबत अधिक माहिती आशी की गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मयताचे पुतणे विक्रम लक्ष्मण दराडे यांना समजल्यानंतर ते शेतातून लगेच घरी आले असता घरासमोर महिला व माझे नातेवाईक जमा झालेले होते. त्याच्या मदतीने माझे चुलते यांचा मृतदेह खाली घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्र, खर्डा येथे उपचाराकामी दाखल केले असता. त्यांनी तेथील कर्तव्यावर असणारे डॉक्टर यांनी ते मयत झाले बाबत घोषित केले.

मयत बाबासाहेब रामभाऊ दराडे हे नेहमी सोसायटीचे कर्ज भरायचे पण कधी पैसै नसले की माझ्याकडे पैसे नसल्याने मी कर्ज भरू शकत नाही असे बोलत असत. कर्ज झाल्याचे नैराश्यातून त्यांनी दि 5 एप्रिल 2023 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या आगोदर राहते घराच्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. तरी पुढील तजवीज होणेस विनंती आहे. याबाबत विक्रम लक्ष्मण दराडे, वय- 34 वर्षे. धंदा- शेती. रा. दरडवाडी, यांनी दिलेल्या खबरीवरून खर्डा पोलीस स्टेशनला आकस्मात नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पो.ना एस.व्ही.शेंडे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here