

जामखेड बाजार समितीसाठी जहीर शेख यांचा आ. रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज दाखल.
जामखेड प्रतिनिधी –
आज दि. 3 एप्रिल रोजी जामखेड येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी जहीर शेख यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केला. तसेच शेतकरी व व्यापारी संघटनेकडुन आ. रोहित दादा पवार यांना उमेदवारीसाठी मागणी केली.

जहीर शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की मी शेतकऱ्यांच्या प्रश्न व अनुदानासाठी तसेच बाजारातील व्यापाऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहील त्याच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. यावेळी उपस्थित संतोष गोरे, गणेश ढगे, अमोल ढगे, सदाशिव ढगे अरिफ शेख, आन्सार पठाण, भाऊसाहेब वराट, मुस्तफा शेख (मेजर) , सुंदरदास बिरंगल साहेब, निलेश पवार (बावी सरपंच) नय्युम शेख, कल्लीमुल कुरेशी (कलु चाचा), जाकीर सय्यद, हनीफ कुरेशी, अबरार कुरेशी, मारूफ कुरेशी, मदनीभाई कुरेशी तसेच बहुसंख्य शैतकरी व व्यापारी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.








