बाजार समितीसाठी अश्विनी रमेश (बाळासाहेब) ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शात दाखल

जामखेड : अश्विनी रमेश (बाळासाहेब) ठाकरे यांचा ग्रामपंचायत मतदारसंघ आर्थिक दुर्बल घटक व ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसाधारण असे दोन उमेदवारी अर्ज आज प्रचंड शक्तिप्रदर्शात दाखल करण्यात आले.

ढोलीबाजासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भव्य रँली काढण्यात आली होती. तालुक्यातील जवळपास ५५ ते ६० ग्रामपंचायत सदस्य व २५ ते ३० सेवा संस्था संचालकांसह समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेली रँली शहरातील लोकांचे लक्ष वेधून घेत होती.

जामखेड बाजार समितीची निवडणूक 18 जागेसाठी

यामध्ये कृषि पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्था मतदारसंघातून 11 सदस्य निवडले जाणार आहेत. या मतदारसंघात सर्वसाधारण 7, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती / भटक्या जाती 1 असे उमेदवार निवडले जाणार आहेत. तर ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी या मतदारसंघासाठी 4 जागा आहेत. यामध्ये सर्वसाधारण 2, अनुसूचित जाती जमाती 1 आणि आर्थिक दुर्बल घटक 1 असे सदस्य निवडले जाणार आहेत. व्यापारी / आडते मतदारसंघासाठी 2 जागा आहेत. हमाल/ मापाडी मतदारसंघासाठी 1 जागा आहे. असे एकुण 18 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक जामखेड हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here