

जामखेड येथिल श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकरी यांच्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना साहीत्य वाटप
जामखेड प्रतिनिधी
मुकबधीर विद्यार्थ्यांच्या आडचणी लक्षात घेऊन शालेय शिक्षण घेत आसताना कसली आडचण येऊ नये या उद्देशाने श्री परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त जामखेड येथिल श्री स्वामी समर्थ केंद्र सेवेकरी यांच्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना गरजु साहीत्य वाटप केले.
ग्रामीण भागातील गरजु मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आर्थिक परिस्थितीमुळे कोणतीही अडचण येऊ नये, तसेच कोणताही मुकबधीर विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आनेक सामाजिक संघटना या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत आसतात याच अनुशंगाने श्री परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र सेवेकरी जामखेड मधील काही सेवेकरी यांनी जामखेड येथिल मुकबधीर निवासी विद्यालयातील विद्यार्थींना वस्त्रदान चटई, भोजन पट्टी, फळे वाटप व मोठी चटई मैट व मिष्ठान्न भोजन वाटप केले. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी श्रीकांत खटावकर, दाखले सर, थोरात काका, प्रलेश बोरा, प्रथमेश कोकणे, किशोर वीर, अंकुश अदापुरे, अमोल शेठ तातेड, उमेश जाधव, सोमा नंदुर्गे, मनोज जाधव सह आनेक मान्यवर उपस्थित होते.






