जामखेड शहरात शांतता पाहिजे ; गुंडगिरीला थारा नाही- ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव.

गुंडागीरी विरोधात जनता उतरली रस्त्यावर, तहसीलवर काढला निषेध मोर्चा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील गोरगरीब जनता आपल्या परीने कष्ट जगत आहे. परंतु जामखेड मधील काही गावगुंडांनी या गोरगरीब जनतेला त्रास देऊन त्यांच्या कडे खांडणी मागण्याचे धंदे सुरू केले आहेत. जर खांडणी दिली नाही तर जीवे मारण्याची धमकी देतात. आशा गावगुंडाचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. कारण जामखेड शहरात गुंडागीरीला थारा नाही आसे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव यांनी व्यक्त केले.

शुक्रवार दि.24/03/2023 रोजी जामखेड शहरातील सर्व संघटना ,पक्ष व नागरिकांच्या वतीने गावगुंड व खंडणी करणाऱ्या बहादरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावा म्हणून जामखेड तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी नेते प्रा.मधुकर आबा राळेभात व वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.डॉ.अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा मोठ्या संख्येने काढण्यात आला .

दि.२१ मार्च २०२३ रोजी रात्री जामखेड शहरातील मोकर गावगुंडाने कलाकेंद्रावर २० मुलांच्या टोळीने शस्त्र घेवून महिलांना मारहाण व छेडछाड करुन धमकी दिली तसेच खंडणी द्या नाही तर कलाकेंद्र चालु देणार नाही असे म्हणून जबरी मारहाण केली ,मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. असून दहशत निर्माण करून ३ कलाकेंद्रावरची मोडतोड केली. जवळपास ३०० कलाकार मंडळी दहशतीच्या छायेखाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ दि २४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता जामखेड बस स्थानक, खर्डा चौक, जयहिंद चौक, कोर्ट गल्ली, तहासिल कार्यालय येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.

गावगुंड व खंडणी बहादरांचा बंदोबस्त करा, सोसनार नाय अत्याचार,आम्ही लढायला आहोत तयार.अशा घोषणा देऊन ॲड.डॉ.अरुण जाधव म्हणाले की हा अत्याचार आता सहन करणार नाही जामखेड तालुक्यातील सगळ्या गावगुंडाचा नयनाट व दादागिरी थांबली पाहिजे नाहीतर गावगुंडांने नडायचे असल्यास माझ्याशी नडा या गोरगरीब जनतेशी नको.

राष्ट्रवादीचे नेते प्रा.मधुकर आबा राळेभात म्हणाले की हा मोर्चा सरकारच्या व गावाच्या विरोधात नाही हा मोर्चा जामखेड तालुक्यातील गावगुंड दादागिरी करणाऱ्याच्या विरोधात आहे.या गावगुंडांना पाच जिल्हे हद्दपार केले पाहिजे व त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे अशी भूमिका मांडली. यावेळी जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी तहसिलदार मा. योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक मा.महेश पाटील तसेच जामखेड तालुक्यातील पक्ष,संघटना राष्ट्रवादीचे नेते प्रा. मधुकर राळेभात,वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव तुपेरे, मनसे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, उपाध्यक्ष सनी सदाफुले, काँग्रेसचे राहुल उगले लोकअधिकार प्रवक्ते बापुसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष अतिश पारवे, संभाजी ब्रिगेड चे कुंडल राळेभात, आदिवासी नेते विशाल पवार, योगेश सदाफुले, प्रथमनगराध्यक्ष विकास राळेभात, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, गणेशशेठ डोंगरे, हभप गाडे (महाराज), सागर अंदूरे, भरत राळेभात, विक्रम डाडर आदींनी पाठिंबा दिला.

यावेळी माजी सरपंच नरेंद्र जाधव, नगरसेवक गुलचंद अंधारे,अमित जाधव, अरुण डोळस, मच्छिंद्र जाधव, धनराज राजगुरु,चंद्रकांत जाधव, रमेश राळेभात, अल्का जाधव , छाया नवले, गीता जाधव, उमा जाधव, रवि अंधारे, विशाल जाधव, समीर चंदन , सनी जाधव ,कृष्णा जाधव, मोहन जाधव,बाबासाहेब काळे,अरविंद जाधव,भिमराव चव्हाण ,वैजिनाथ केसकर,संतोष चव्हाण,ऋषी गायकवाड,सचिन भिंगारदिवे, संतोष पवार,शुभम जाधव, उमेश जाधव मोट्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here