हप्ता न दिल्याने गुंडाच्या टोळीचा शहरातील तीन कलाकेंद्रावर धुडगूस, सात ते आठ आरोपींविरोधात खांडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल

जामखेड प्रतिनिधी : कलाकेंद्र चालकांना हप्ता मागितल्यावर तो न दिल्याने शहरातील तीन कलाकेंद्रावर गुंडाच्या टोळीने धुडगूस घातला तसेच लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने साहित्यांची तोडफोड करत कलाकेंद्रावर दगडफेक केली. या प्रकरणी एकुण सात ते आठ जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अक्षय उर्फ चिंग्या मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) तुषार पवार,(पुर्ण नाव माहीत नाही) सोम्या पवार (पुर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. जांबवाडी ता. जामखेड जि. अहमदनगर व इतर 4 ते 5 अनोळखी युवक अशा एकुण 7 ते 8 जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि. २१ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वरील आरोपींनी झंकार सांस्कृतिक कला केंद्र, जगदंबा सांस्कृतिक कला केंद्र नगर रोड जामखेड व भाग्यलक्ष्मी कला केंद्र बीड रोड जामखेड या तीन कलाकेंद्रावर येऊन आरोपी म्हणाले की, तुम्हाला कलाकेंद्र चालवायचे असतील तर तुम्ही आम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल मात्र कलाकेंद्र चालकांनी हप्ता देण्यात नकार दिल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने या तिन्ही कलाकेंद्रावर धुडगूस घालण्यास सुरूवात केली या नंतर या आरोपींनी कलाकेंद्राच्या खिडक्यावर दगडफेक केली तसेच काही आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने कलाकेंद्रातील खुर्च्या, कुलर, पीओपीची मोडतोड करत नुकसान केले.

आरोपींनी केलेल्या दगडफेकीमध्ये फिर्यादी कलाकेंद्राच्या मालकिण लता शालन जाधव व दोन कलावंतीन अशा तीन जखमी झाल्या. तसेच आरोपी टोळके यावर न थांबता कलाकेंद्र चालकांना जाताना म्हणाले की, तुम्ही जर आता हप्ता दिला नाही तर तुम्हाला बघून घेऊ म्हणून शिवीगाळ केली.

या प्रकरणी फिर्यादी लता शालन जाधव (वय ५५) सांस्कृतिक कलाकेंद्र मालक यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील सात ते आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.

चौकट

वरील घटनेवरून आसे दिसुन येते की गेल्या तीन वर्षांपासून शांत आसलेल्या जामखेड शहरात पुन्हा गाव गुंडाची दहशत पसरण्यास सुरवात झाली आहे. कलाकेंद्रवर घडलेल्या घटनेमुळे कलाकेंद्र चालक, शहरातील व्यापाऱ्यांनसह नागरीकांन मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी अशा गावगुंडाचा तातडीने बंदोबस्त करावा आशी माहिती नागरिकांन कडुन होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here