पिंपळगाव आळवा येथे संत तुळशीराम महाराजांचा २८ वा जन्मोत्सव सोहळ्यास सुरवात
जामखेड प्रतिनिधी दि
बालयोगी सद्गुरू संत तुळशीराम महाराज यांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र पिंपळगाव आळवा ता. जामखेड येथे दि ०५ पासून संत तुळशीराम महाराजांचा जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्ताने नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. काकासाहेब मोहिते यांनी केले आहे.

संत तुळशीराम महाराजांचे कार्य समाजातील सर्व थरात सुयोग्य पद्धतीने पोहोचावे म्हणून मोहिते कुटुंबियांनी गावकऱ्याच्या मदतीने व डॉ. काकासाहेब चंद्रकात मोहिते यांच्या पुढाकाराने श्री संत तुळशीराम महाराज बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे आनेक सामाजिक, शैक्षणिक तसेच धार्मिक उपक्रमाचे आयोजन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन करतात. संस्थेच्या वतीने रि ५ मार्च ते ६ मार्च या कालावधीत जन्मोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने दि ०५ रोजी ह भ प नारायण महाराज दौड दि ०६ रोजी भगवंताचार्य ह भ प शिवांजली ताई महाराज जरांगे तर दि ०७ रोजी ह भ प बबन महाराज बहिरवाल यांचे कल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर लागेचच महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे यावेळी गावातील व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी तसेच समाजामध्ये उत्कृष्ट सामिजिक कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान केला जाणार असून आरोग्यदूत पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी,तर आदर्श पत्रकारिता पुरस्कार दैनिक प्रभातचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांना देण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी बाबाची कर्मभूमी असलेल्या मुठेवाडगाव ता : श्रीरामपूर येथील भावीक भक्त उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात.हा पूर्ण कार्यक्रम दरवर्षी सप्तहा कमिटी व ग्रामस्थ हा पूर्ण कार्यक्रम करत असतात.

चौकट –
संजय कोठारी, ओंकार दळवी याना पुरस्कार जाहीर
श्री संत तुळशीराम महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आरोग्यदूत पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार दैनिक प्रभाचे तालुका प्रतिनिधी ओंकार दळवी यांना जाहीर करण्यात आला असून दि ०७ रोजी पिंपळगाव आवळा येथे मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.









