मनसे नेते संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी जामखेड येथे मनसे कडुन निषेध, आरोपींना तात्काळ अटक करण्याची केली मागणी

जामखेड प्रतिनिधी

दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना चार अज्ञात इसमांनी मनसे नेते संदीप देशपांडे त्यांच्यावर हल्ला केला. क्रिकेट स्टम्प्सने हा हल्ला करण्यात आला असून, हल्लेखोरांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. या घटनेचा नुकताच जामखेड येथिल मनसे च्या वतीने निषेध करण्यात आला व संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांना समजताच संपुर्ण महाराष्ट्रात या घटनेचा निषेध करण्यात आला. त्यांच्यावर मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे ही घटना घडली चार अज्ञात व्यक्तीने त्यांचेवर हल्ला केला स्टम्प्सने देशपांडे यांना मारहाण केली. राजकिय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी तोंडाला मास्क लावून देशपांडे यांच्यावर हल्ला केला आहे. तरी या घटनेचा आम्ही निषेध करत आसुन लवकरात लवकर संबंधित आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी जामखेड च्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे.

या गंभिर घटनेप्रकरणी आरोपींची चौकशी करावी व कठोरात कठोर कारवाई करावी असे निवेदन जामखेड तहसील येथे देण्यात आले यावेऴी म.न.से तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे , पै. हवा सरनोबत , सनी सदाफुले, पांडुराजे भोसले, पै.आकाश साठे, बाऴु ढाळे ,उमेश मुऴे, अक्षय गुजाऴ ,अशोक कापसे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here