सावता परिषदेच्या अधिवेशनास माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – संतोष मोहळकर जिल्हा संपर्कप्रमुख.

जामखेड प्रतिनिधी

अहमदनगर येथे होणार्‍या सावता परिषदेच्या अधिवेशनास सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख संतोष मोहळकर व सावता परिषद तालुकाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील माळी समाजाच्या प्रश्नावर मंथन करण्यासाठी सावता परिषदेचे त्रैवार्षिक अधिवेशन व माळी समाज मेळाव्याचे आयोजन शनिवारी दि.४ मार्च रोजी अहमदनगर येथील टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स या ठिकाणी करण्यात आले आहे.या अधिवेशनास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती व सावता परिषद संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन माळी समाज मेळावा पार पडत असून या मेळाव्यास जामखेड तालुक्यातील सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नगर जिल्ह्याचे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष मोळकर,सावता परिषद तालुकाध्यक्ष सोमनाथ राऊत यांनी केले आहे.

राज्यातील माळी समाज संघटित करण्याचे काम सावता परिषदेच्या झेंड्याखाली होत आहे. संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब दिन – दुबळे सर्वसामान्यांचे,शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. कार्यक्रमास सावता परिषद पदाधिकारी, सावता सैनिक व तमाम माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष मोहळकर, सोमनाथ राऊत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here