Home क्राईम न्यूज कलाकेंद्रा मधिल नर्तिकेची लाॅजवर गळफास घेऊन आत्महत्या

कलाकेंद्रा मधिल नर्तिकेची लाॅजवर गळफास घेऊन आत्महत्या

कलाकेंद्रा मधिल नर्तिकेची लाॅजवर गळफास घेऊन आत्महत्या

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल नगर रोडवरील आसलेल्या आंबिका कला केंद्रातील एका नर्तिकेची जवळच आसलेल्या नगर रोडवरीलच एका लॉजवर छताच्या पाख्यांला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरची घटना आज दि २८ सकाळी घडली असुन रेखा सुभाष कोळी (वय ४५) मांगडे चाळ, बार्शी जिल्हा सोलापूर, (हल्ली मुक्काम, आंबीका कला केंद्र, जामखेड) आसे
आत्महत्या केलेल्या नर्तिकेचे नाव आहे.

सदर आत्महत्या केलेल्या नर्तिकाने नगर रोडवरील आसलेल्या कृष्णा हाॅटेल च्या रूम नंबर ३ मध्ये काल दि. २७ फेब्रुवारी दुपारी २:३० पासून राहात होती. सकाळी रूम स्वच्छ करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेल्या हाॅटेल मालक व या घटनेतील खबर देणारे तुकाराम रामराव ढोले यांच्याशी सकाळी ८:३० च्या दरम्यान संवाद साधल्यानंतर काही वेळानंतर ही घटना घडली असावी असा अंदाज हाॅटेल कृष्णाचे मालक ढोले व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली. यानंतर मयत नर्तिका रेखा सुभाष कोळी हीस जामखेड ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. सदर आत्महतेचे कारण अद्याप समजले नसून जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आसुन या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शिवाजी भोस हे करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!