शिऊर येथे महाशिवरात्री निमित्त पै. विकास (काका) तनपुरे प्रतिष्ठाण च्या वतीने कीर्तन सोहळ्याचे आयोजन

जामखेड (प्रतिनिधी) पै. विकास (काका) तनपुरे प्रतिष्ठाण आयोजित सार्वजनिक महाशिवरात्री निमित्त शिऊर या ठीकाणी भव्य एक दिवसीय किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी ह. भ. प. भागवताचार्य कु. प्रतिक्षाताई करडुळे महाराज बीड यांचे कीर्तन होणार आहे तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पै. विकास (काका) तनपुरे प्रतिष्ठाण व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड तालुक्यातील शिऊर या ठीकाणी महाशिवरात्री चे औचित्य साधून शनिवार दि १८ फेब्रुवारी २०२३ रोजी भव्य एकदिवसीय कीर्तन सोहळा श्री काळभैरवनाथ मंदिरा समोर आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ७ ते ८ या वेळी श्री भुवनेश्वर महाअभिषेक ८ ते ९ प्रसाद वाटप तर सायंकाळी ८ ते १० या वेळेत ह. भ. प. भागवताचार्य कु. प्रतिक्षाताई करडुळे बीड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या वेळी गायनाचार्य ह. भ. प. बापू महाराज सुर्वे, मृदुगांचार्य ह. भ. प रविंद्र महाराज पाठक कुसडगाव व ह. भ. प. चि. अभिषेक महाराज बागल शिऊर हे या ठीकाणी गायन व वादन करणार आहेत. तरी या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांनी उपस्थित रहाण्याचे अवहान पै. विकास (काका) प्रतिष्ठाण व शिऊर येथिल ग्रामस्थांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here