पत्रकार शशिकांत वारीशे हत्या प्रकरणातील ओरोपीवर कडक कारवाई करावी – मा. सरपंच गफ्फारभाई पठाण

जामखेड प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या झाली. राज्यभरात पत्रकारांवरील हल्ले वाढत चालले आहेत. पत्रकाराची हत्या करण्यात आलेल्या आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी पाटोदा गरडाचे येथिल मा. सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी दिलेल्या निवेदनात केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्यावर दि.६ फेब्रुवारी रोजी दुपारी राजापूर महामार्गावरील पेट्रोल पंपा जवळ यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्यात आली होती. यामध्ये संशयित असलेले आरोपी पंढरीनाथ अंबरकर यांना अटक झालेली असुन या गुन्ह्याची चौकशी करून सदरचा खटला फास्ट ट्रॅकने चालवण्यात यावा व त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी.

या घटनेचा निषेध करत तहसिल कार्यालय व जामखेड पोलीस स्टेशन येथे नुकतेच पाटोदा गरडाचे येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी विविध कार्यकारी सोसायटी संचालक अन्सारभाई पठाण, भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष बाबासाहेब फुलमाळी, लहुजी शक्ति सेना जामखेड तालुका अध्यक्ष पोपट फुले, मुस्लिम विकास परिषद , पाटोदा (ग) अध्यक्ष खालेद पठाण, केदार वाबळे, रमजान सय्यद, अंबादास पवार, आरकम सय्यद, राजु भवर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here