मनसे तर्फे शिवजयंती निमित्ताने जामखेडमध्ये राज्यस्तरीय नुत्य स्पर्धचे आयोजन

जामखेड (प्रतिनिधी) सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल उद्योग समूह व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत स्थानिक कलाकारांसह राज्यातील नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्द व्हावे याकरिता याहीवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि १८ ते १९ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय वैयक्तिक व समूह नुत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून असल्याची माहिती मनसे नेते उद्योजक हवादादा सरनोबत,युवा नेते बापूसाहेब कार्ले यांनी दिली.

येथील नगर रोड वरील जामखेड सेंट्रल पंचायत समिती समोर असलेल्या प्रागंणात दि १८ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक लहान गट नुत्य स्पर्धा व वैयक्तिक मोठा गट नुत्य स्पर्धा तर १९ फेब्रुवारी रोजी समूह ग्रुप स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून दि १९ रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या नंतर दि १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते १४ गट मध्ये लहान गट वैयक्तिक नुत्य स्पर्धा होणार असून याकरिता प्रथम बक्षीस मिलन कांकरिया ७ हजार ,िद्वतीय बक्षिस तात्या कदम ५ हजार तृतिय बक्षिस मदन गोलेकर ३ हजार,चतुर्थ बक्षीस पोपट कार्ले २ हजार असणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता गट वैयक्तिक नुत्य स्पर्धा होणार असून याकरिता प्रथम बक्षीस काझी स्टोन क्रेशर ११ हजार,,िद्वतीय बक्षिस आलेश जगदाळे ७ हजार,तृतिय बक्षिस रवी अंधारे ५ हजार,चतुर्थ बक्षीस गणेश पवार ३ हजार,दि १९ रोजी खुला गट समूह नुत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून प्रथम बक्षीस प्रा सचिन गायवळ ३१ हजार,िद्वतीय बक्षिस संतोष फिरोदिया २१ हजार ,तृतिय बक्षिस वैभव जामकावळे ११ हजार ,चतुर्थ बक्षीस गणेश डोंगरे ७ हजार सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक विजेत्यांना बक्षीस वितरण त्याच दिवशी देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता श्रीधर सिध्देश्र्वर ९८२२४१२७४१,ओंकार दळवी ९०११५०१२२१,अविनाश बोधले ९५९५४२२४२२,सनी सदाफुले ९८९०८१५५९९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्पर्धा यशस्वी होण्याकरिता आयोजक मनसे नेते हवादादा सरनोबत,मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे कुसडगांवचे सरपंच ,बापुसाहेब कार्ले मनसे ता उपाध्यक्ष,सनी सदाफुले,विशाल भांडवलकर,बालु साठे,सोनु कदम आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here