आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेडला 13 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक महानाट्या पहाण्याची संधी

छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे ऐतिहासिक महानाट्या

जामखेड (प्रतिनिधी) आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेडला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे ऐतिहासिक महानाट्या जामखेड येथिल ल. ना. होशिंग विद्यालयाल येथे दि 13 फेब्रुवारी रोजी जामखेडकरांना पहावयास मिळणार आहे.

आ. रोहित पवार हे आपल्या कर्जत जामखेड मतदारसंघात विकास कामाबरोबरच नागरिकांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत आसतात. याच आनुशंगाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड येथिल ल. ना. होशिंग विद्यालयाल या ठीकाणी दि 13 फेब्रुवारी सायंकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचे ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या महानाट्यात भक्ती शक्तीचा आनंद सोहळा पहाण्याचा एक आगळा वेगळा क्षण जामखेड करांना पहावयास मिळणार आहे. या नाटकाचे लेखक बाबाजी राणे तर दिग्दर्शक संतोष पवार यांनी केले आसुन निर्मिती ज्ञानेश्वर महाराव यांनी केली आहे. विषेश म्हणजे देखण्या टीव्ही स्टार कलाकारांसह ज्ञानेश महाराव आणि साक्षात तुकोबा प्रतिबालगंधर्व विक्रांत आजगावकर हे या महानाट्यात पहावयास मिळणार आहे.

सदर महानाट्या विनामूल्य प्रेक्षकांना पहावयास मिळणार असुन ओम नाट्यगंधा मंबई निर्मित आसलेल्या या जगद्गुरू आणि छत्रपती शिवरायांची ही ऐतिहासिक भेट साक्षात पहाण्यासाठी या महानाट्यास उपस्थित रहाण्याचे अवहान राष्ट्रवादी काँग्रेस व कर्जत जामखेड चे आ. रोहित पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here