

हज कमिटीचे पहीले सदस्य पद जामखेड तालुक्याला मिळाले अभिमानाची गोष्ट – मा. सरपंच गफ्फारभाई पठाण
मा.सरपंच गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने सलिम बागवान यांचा केला सत्कार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्याला हज कमीटीचे पहीले सदस्य पद मिळाले आहे. त्यामुळे ही तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भाजप सरकारने अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीला एवढे मोठे पद दिले ही कैतुकास्पद बाब आहे आसे मत पाटोदा गरडाचे येथिल मा. सरपंच गफ्फारभाई पठाण यांनी सत्कारा दरम्यान केले.
महाराष्ट्र राज्य हज कमिटी सदस्य पदी सलीम बागवान यांची निवड झाल्या बद्दल जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील सामाजिक कार्यकर्ते व दबंग मा.सरपंच गफ्फारभाई पठाण व सर्व पाटोदा ग्रामस्थांच्या वतीने जंगी स्वागत करून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी अशोक मोरे, राजेंद्र सिंगने ,संजय ढवळे ,आय्यास पठाण ,निवृत्त महारनवर, मुकुंद आप्पा कडु ,शिवाजी तनपुरे,तंटा मुक्ति अध्यक्ष देवा मोरे, युवराज पवार ,नाना वाघमोडे , अफसर पठाण,दत्ता भाकरे, इरफ़ान शेख,मुजाहिद पठाण,रज्जाक मुलानी,अशोक समुद्र,बापु मोरे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






