

पोद्दार लर्न स्कुल जामखेड विद्यार्थ्यांनी पवनचक्कीला भेट देऊन घेतली माहिती जाणून
जामखेड प्रतिनिधी
पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचे व्यावहारिक ज्ञान वाढले पाहिजे या प्रमुख उद्देशाने पोद्दार लर्न स्कुल जामखेड च्या विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने पवनचक्की बाबत माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थांना या गोष्टींचा आनुभव यावा यासाठी जामखेड परीसरातील पवनचक्कीला भेट देऊन माहिती समजावुन घेतली.

पोद्दार लर्न स्कुल जामखेड च्या सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी कुसळंब परीसरातील पवन चक्कीला भेट देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या भेटीचे आयोजन मुख्याध्यापक प्रशांत जोशी यांच्यासह अविनाश खेडकर, वैभव झरकर यांनी केले होते.

विद्यार्थ्यांनासमावेत स्टाफ अविनाश खेडकर अॅलेक्स फिग्रेडो, किशोर हरणे, प्रियांका मुंजाल आणि तस्लिमा शेख हे उपस्थित होते. तसेच अधिकारी राजेंद्र डोंगरे, सागर अग्रवाल, बाप्पू टेकाळे, व दादासाहेब बनकर. यांनी पवन चक्की बाबत महत्वपूर्वक माहिती दिली. त्यांनी त्यांचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना समजावून सांगितले आणि पवन चक्कीच्या कार्यपद्धतीवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली, त्या सर्व अधिकाऱ्यांची शाळा नेहमीच आभारी आहे. विद्यार्थ्यांना पवन चक्कीबाबत कार्य समजून घेण्यासाठी ही मोहीम अतिशय फायदेशीर ठरली.

कालिका पोदार लर्न स्कूलची नेहमीच इच्छा असते की अशा भेटीतून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त शिकावे, कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञान अधिक महत्त्वाचे आहे असे आमचे ठाम मत आहे. विद्यार्थ्यांना अधिक ठोस अनुभव देण्यासाठी शाळा भविष्यात अशा अधिक अधिक भेटींचे आयोजन करणार आशी माहिती शाळेच्या वतीने देण्यात आली.






