नुसते पत्र देऊन नीधी मिळत नसतो – आ. प्रा राम शिंदे


जामखेड येथे पत्रकार दिनानिमित्त खा. सुजय विखे-पाटील व भाजपच्या वतीने स्नेह संवाद कार्यक्रम संपन्न.
जामखेड (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गांचा कोट्यवधी नीधी केंद्रात भाजपचे सरकार आसल्याने मिळाला आहे. कोणी जाऊन पत्र दिले की नीधी मिळत नसतो. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना देखील कोट्यवधी नीधी खा. सुजय विखे-पाटील यांनी मंजुर करुन आणला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचे श्रेय कोणी घेऊ नये असा टोला आ. रोहित पवार यांना आ. राम शिंदे यांनी लावला.

जामखेड येथे पत्रकार दिनानिमित्त खा. सुजय विखे-पाटील व सर्व भाजपाच्या यांच्या वतीने स्नेह संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमातसाठी आमदार प्रा. राम शिंदे, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, सोमनाथ पाचारणे, रवी सुरवसे, सलीम बागवान, ज्ञानेश्वर झेंडे, प्रा. अरूण वराट, शरद कार्ले, अरूण म्हस्के, बाजीराव गोपाळघरे, धामणगावचे सरपंच महारुद्र महारनवर, कैलास वराट, महादेव वराट, अंकुश ढवळे, तुषार पवार, गोरख घनवट, मनोज कुलकर्णी, ॲड. बंकट बारवकर, प्रविण सानप, प्रविण चोरडिया,उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. प्रा राम शिंदे म्हणाले की पत्रकाराने नीटनेटके लिखाण केले तर एखाद्या मंत्री घरी बसु शकतो एवढी ताकत पत्रकारांमध्ये आहे. आमचं काय चुकत असेल तर आम्हाला
थेट सांगा, नसेल डायरेक्ट सांगायचं तर बातमीच्या माध्यमांतून सांगा, आम्ही त्याच्यात दुरूस्ती करू, निटनाटका कार्यक्रम करू, काही अडचण नाही, पण फक्त आमची चुकीची बाजू मांडू नका तर
सगळ्यांच्याच बाजू मांडा, सगळ्यांना
समान न्याय द्या, आम्हाला तुम्ही झोडा पण इतर कोणालाही सोडू नका, निर्भीड पत्रकारितेचा वसा जपा, मी मागच्या दाराने आलो म्हणून टिका करतात पण सरकार पुढच्या दाराने आले आहे. आसे देखील आ प्रा.राम शिंदे यांनी बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना खासदार डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की आमदार प्रा. राम शिंदे यांनी मंजूर केलेल्या कामांचे नारळ फोडण्यात विद्यमान आमदाराने अडीच वर्षे घातले. मोठ्या प्रमाणावर दडपशाही केली अनेकांवर दबाव आणून पक्ष प्रवेश घडविले. परिसराचा खरा विकास भाजपाच करू शकतो असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांसाठी आवश्यक असलेल्या सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. पत्रकारांनी नेहमी वास्तविकता तपासून काम केले पाहिजे. आमच्यावर टिका करा पण आमच्या कामाचे श्रेय आम्हाला द्या असेही सांगितले.

यावेळी पत्रकार नासीर पठाण, वसंत सानप, सुदाम वराट, बाळासाहेब शिंदे यांनी आपले मत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अमित चिंतामणी यांनी केले तर सूत्रसंचालन कैलास वराट यांनी केले तर आभार शरद कार्ले यांनी मानले.






