जामखेड तालुक्यातील इसमाची कुसळंब शिवारात आत्महत्या

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील उंडा पिंपळगाव येथिल इसमाने पाटोदा तालुक्यातील कुसळंब शिवारात येऊन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना दि १५ रोजी उघडकीस आली असुन. पाटोदा पोलिसांत अकस्मात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अशोक महादेव ढगे वय ४६ रा. उंडा पिंपळगाव, ता जामखेड असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव असुन तो दि १४ पासुन घरातुन बेपत्ता होता. मयत अशोक महादेव ढगे याची सासरवाडी पाटोदा तालुक्यातील चुंभळी येथिल आहे. मयत इसम हा जामखेड कुसळंब मार्गे कुसळंब शिवारात आला असावा. येथेच एका शेतात त्याने सोबत आणलेले विष प्राशन करून जिवन संपवले.मयता जवळच पोलिसांना पिशवीत देशी दारुचा खंबा, एक विषारी औषधाची बाटली, खाण्यासाठी आणलेली भेळ,व रस्सी आदी वस्तू मिळुन आल्या.

गहिनीनाथगडावरील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात बंदोबस्तासाठी पाटोदा व अंमळनेर पोलीस असतानाही दोन वाजता एका गुराख्यास प्रेत दिसताच व खबर मिळताच पाटोदा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पतंगे,बीट अंमलदार सारुक साहेब,व पोलिस कर्मचारी बाळासाहेब सानप यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाटोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. अशोक महादेव ढगे हा ऊसतोड मजूर असुन पत्नी व दोन मुलांसह रहात होता. उसतोडणी बंद करुन पिक अप हे वाहन घेतले होते.तर त्याने आत्महत्या का केली याचे कारण समजले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here