नाशिक पदवीधर मतदारसंघातील घडामोडी; डॉ. सुधीर तांबे काँग्रेस पक्षातून निलंबित

नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी आणि यातील उडामोडींमुळे आता राजकारण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी स्वतः अर्ज न भरता त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला. त्यांच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा अर्जच दाखल झाला नाही. या घडामोडींमुळे आता पक्षाने तांबे यांच्यावर कारवाई केली आहे.

काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई केली असल्याचं पत्र जारी करण्यात आलं आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबित असणार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सुधीर तांबे यांची अधिकृत घोषणा झाल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. यानंतर सुधीर तांबे यांनी अर्ज न भरणे आणि सत्यजित तांबे यांची उमेदवारी याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती तसेच याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवण्यात येत होते.

काँग्रेस पक्षानेही या घटनेची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने पश्रश्रेष्ठींना दिली होती. तसेच योग्य ती कारवाई करण्याचीही मागणी केली होती. त्याची दखल घेत काँग्रेस पक्षाध्यक्षांच्या सूचनेनुसार पक्षाच्या शिस्तपालन समितीने डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित केलं आहे. याबाबतची चौकशी पूर्ण होईपर्यंत ते पक्षातून निलंबन राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here