

जामखेड येथुन अपहरण करून ठेवले दुकानात डांबुन, तीन जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
चारचाकी गाडीत घालुन जामखेड येथुन कर्जत येथे पळवुन नेऊन त्या ठिकाणी फीर्यादीस दुकानात डांबुन ठेवले व पाईप ने मारहाण करत अपहरण करण्यात आले. तसेच फीर्यादीस शंभर रुपयांच्या बॉंण्डवर नोटरी करुन कोऱ्या चेकवर सह्या घेऊन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तीघांन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंकर तात्या लोखंडे, ताया तात्या लोखंडे व अनिल वाघमोडे (पुर्ण नाव माहीत नाही) तीघे रा. आरोळे वस्ती, जामखेड अशी तीघा आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी की दि ९ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता फीर्यादी म्हसु रामा फुलमाळी वय ४२, धंदा हॉटेल रा. म्हेत्रे वस्ती, जामखेड यास वरील आरोपींनी म्हेत्रे वस्ती ते खडकवाडीकडे जाणाऱ्या रोडवर जाधव यांच्या शेताजवळ आरोपींनी आणलेल्या चार चाकी गाडी मध्ये बळजबरीने घातले व त्यास कर्जत येथील एका दुकानात डांबुन ठेऊन प्लास्टिक च्या पाईप ने मारहाण केली. तसेच आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर फीर्यादी कडुन त्याच्या मर्जी विरोधात शंभर रुपयांच्या बॉंण्डवर नोटरी करुन कोऱ्या चेकवर सह्या घेऊन जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

याबाबत संबंधित फीर्यादी म्हसु रामा फुलमाळी याने दि १० जानेवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सा.पो.नि. सुनील बडे हे करत आहेत.







