मास्तरांनो, सहली नेताय, आता तरी सावध व्हा.! रायगडच्या काशिद बीचवर सहा विद्यार्थी बुडाले. चौघे वाचले..पण….

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहलीला काळाची दृष्ट लागली. बीचवर फिरायला गेलेल्यांपैकी ६ विद्यार्थी पाण्यात बुडाले, त्यापैकी ४ जणांना वाचविण्यात यश आले, तर एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला.

एक विद्यार्थी अद्याप बेपत्ता आहे.

सानेगुरुजी विद्यालयाची सहल मुरूड जंजिरा येथील काशिद बीचवर गेली. तेथे सात विद्यार्थी समुद्रात उतरले. त्यावेळी त्यांच्यासमवेत शाळेतील पाच शिक्षकही होते.

मात्र अचानक विद्यार्थी खोल समुद्रात गेले आणि लाटेच्या प्रवाहात बुडाले. त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा करताच शिक्षकांनी धावाधाव केली व त्यातील चौघांना वाचविण्यात यश आले. मात्र प्रणव कदम या विद्यार्थ्याचा यात करूण अंत झाला, तर रोहन बेडवाल हा विद्यार्थी सापडलाच नाही.

या विद्यालयातील विद्यार्थ्यांवर अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या कृष्णा पाटील, तुषार वाघ, रोहन महाजन व सायली राठोड या विद्यार्थ्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here