जामखेड एस टी बस स्थानकाच्या पाच बांधकाम कामगारांवर कोयता, रॉड व कुर्‍हाडीने हल्ला

जामखेड पोलीस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड येथिल नवीन एस टी बस स्थानकाच्या बांधकामत बसुन येथे दारु पिऊ नका असा म्हणाल्याचा राग आल्याने जामखेड शहरातील पाच जणांनी येथिल बांधकामावर काम करत आसलेल्या पाच बांधकाम कामगारांवर कोयता, लोखंडी रॉड व कुर्‍हाडीने हल्ला केला. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश राजेंद्र काळे, रा. गोरोबा टॉकीज जामखेड, चंद्रकांत राजेंद्र काळे, शिवाजी राजेंद्र काळे, राणा कल्याण काळे, खंडू उर्फ किरण रावसाहेब काळे, रा. भूतवाडा रोड, जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींची नावे आहेत. पोलिसांन कडुन मिळालेली माहिती अशी की जामखेड येथिल बस स्टॉन्ड मध्ये गेल्या काही महिन्यांपासून नविन बस स्थानकाचे बांधकाम सुरू आहे. या ठीकाणी परगावाहून काही कामगार काम करण्यासाठी आले आहेत. दि ५ जानेवारी २०२३ रोजी रात्री साडेदहा वाजता या बांधकाम सुरू असलेल्या एस टी बस स्थानकाच्या हॉल मध्ये तीन जण दारु पित बसले होते. यावेळी त्यांना या ठीकाणी आसलेल्या योगेश कीसन भोरकडे यांनी सांगितले की या ठीकाणी दारु पिऊ नका आमचे साहेब आम्हाला ओरडतात असे आरोपींना म्हणाल्याचा राग आल्याने त्यांनी फोन करून आनखी दोन जणांना त्या ठिकाणी बोलवले व या पाच जणांनी या ठीकाणी लावण्यात आलेल्या लाईट फोडुन बांधकाम कामगार योगेश कीसन भोरकडे, बलीराम कोल, राधेश्याम विश्वकर्मा, शरद जालिंदर सुपेकर व आकाश विनोद शिंदे या पाच जणांवर लोखंडी रॉड, कोयता व कुर्‍हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत.

या बाबत ची माहिती आ. रोहित (दादा) पवार यांचे तालुका समन्वयक नंदकुमार हंगे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन करून घटनेची माहिती दिली कोठारी यांनी ताबडतोब आपली रुग्णवाहिका घेऊन जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे जखमींना दाखल केले. या हल्ल्यात दोघांचे हात मोडले असून दोघांच्या डोक्याला कोयत्याने जबर मारले आसल्याने पुढील उपचाराकरता अहमदनगर येथे पाठवण्यात आले आहे. जामखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक शिंदे यांनी ताबडतोब उपचार केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे यावेळी विनय डुकरे, वसीम सय्यद, महेश राळेभात,नंदकुमार हंगे, राहुल घोरपडे ,किशोर बोराडे ,सचिन बेग यांनी देखील जखमींना रुग्णालयात घेऊन जाताना मदत केली.

या प्रकरणी संतोष नंदराम पवार वय 36 रा. साईनगर पंचायत समिती समोर श्रीगोंदा हल्ली रा. जामखेड यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. साठे हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here