आई वडीलांनी दिलेले संस्कार व माणुसकी जाधव कुटुंबीयांनी जपली – आ. रोहित पवार

राजनंदिनी लेडीज शॉपी शाखा नं. २ चे आ.रोहित पवार यांच्या हस्ते झाले उद्घाटन

जामखेड (प्रतिनिधी) अतिशय चिकाटिने व प्रमाणिकपणे व्यावसाय केल्याने जाधव कुटुंबाला व्यवसायामध्ये यश मिळत गेले आहे. त्यांची व्यावसायात होत आसलेली प्रगती कैतुकास्पद आहे. आई वडीलांनी दिलेले संस्कार व माणुसकी या जाधव दांम्प्त्याने जपली आहे. आसे मत आ. रोहित पवार यांनी उद्घाटना प्रसंगी व्यक्त केले.

जामखेड शहरातील तपनेश्वर रोड,मारुती मंदिर शेजारील राजनंदिनी लेडीज शॉपी शाखा नंबर २ चे उद्घाटन कर्जत / जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पुढे उद्घाटना प्रसंगी बोलताना आ. रोहित पवार म्हणाले की आमदार पवार म्हणाले, एका चांगल्या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी बोलावले याचा मनस्वी आनंद आहे. आई वडीलांनी दिलेले संस्कार व माणुसकी या दांम्प्त्याने जपले आहे. एखाद्या वास्तूचे त्या कारागीराने काम करून त्याचा मोबदला दिल्या नंतर समाजात परत त्या कारागीराचा फारस कोणी आदर करत नाही. पंरतु या दांम्प्त्याने या वास्तूच्या कारागीरांचा सन्मान केला आहे. आजच्या युगातील माहिला पुरुषांच्या बरोबरीने व्यावसायातही आपली जबाबदारी भक्कमपणे पेलावून आपला व्यावसाय यशस्वी करुन दाखवत आहे. व्यावसाय बरोबरच जाधव कुटूंब आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत अंत्यत प्रगल्भ आहे. ज्या आस्थेने आपण आपले घर अथवा व्यावसायासाठी दालन उभा करतो त्याच प्रमाणे आपणाला हे शहर निर्माण करायचे आहे.

प्रास्ताविक प्रसंगी राजेंद्र जाधव म्हणाले, मी अगदी तुटपुंज्या रकमेत जामखेड शहरात माझ्या व्यावसायाची सुरवात केली.अतिशय चिकाटिने व प्रमाणिकपणे व्यावसाय केल्याने मला यश मिळत गेले. माणसाने यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी निर्वसनी असणे गरजेचे आहे. आम्ही उभय दांम्पत्य ग्रामीण भागातील असल्याने गरिबीची जाण होती. लेडीज शॉपी या व्यावसायामध्ये पत्नीने साथ दिली. व जामखेड करांच्या सेवेत हे दुसरे दालन सुरु करीत आहोत.

या भव्य दालनाच्या उद्घाटन प्रसंगी हभप कैलास महाराज भोरे यांनी आशिर्वाद दिले तर प्रा.मधुकर
राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी हभप कैलास महाराज भोरे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते वैजिनाथ पोले, प्रा.मधुकर राळेभात, तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे, सुर्यकांत मोरे, शहराध्यक्ष राजेंद्र गोरे, शिवसेना तालुका अध्यक्ष संजय काशिद , प्रा. कैलास माने (सर), स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे मंगेश आजबे, काँग्रेसचे राहुल उगले, अक्षय शिंदे, राजु भोगिल, निखिल घायतडक, उमर कुरेशी, नगरसेवक मोहन (वस्ताद) पवार, अमित जाधव, महेंद्र राळेभात, अँड हर्षल डोके, प्रविण उगले, महेश राळेभात, प्रशांत राळेभात, बापु शिंदे, सरपंच हनुमंत पाटील, नरेंद्र जाधव, सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, इस्माईल सय्यद, हरिभाऊ आजबे, कुंडल राळेभात, सचिन शिंदे, कैलास महाराज नेटके, डाँ.चंद्रशेखर नरसाळे ,वैभव तवटे , गणेश हगवणे, कृष्णा डोरले, संदिप गायकवाड,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here