महावीर भवन येथे ॲक्युप्रेशर वायब्रेशन, सुजोक शिबिरास सुरवात

जामखेड प्रतिनिधी

जामखेड येथिल महावीर भवन येथे दि. ३ फेब्रुवारी पासुन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्थान, जोधपुर (राजस्थान) यांच्या वतीने एक्यूप्रेशर, वाइब्रेशन, सुजोक, चिकित्सा शिबीरास सुरवात झाली आहे. गरजूंनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


या शिबिराचे उद्घाटन जामखेड येथील राजेंद्र सुभाष कोठारी (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस ) यांच्या शुभहस्ते झाले असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष जामखेडचे उद्योगपती लकीचंद बाफना होते.

यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले जयंतराव संघ आत्तापर्यंत बरेच उपक्रम हाती घेतले असून घेतलेले शिबिर हे सर्व लोकांचे उपयोगी पडणार आहे लोकांना बाहेर जाऊन ट्रीटमेंट घ्यावे लागते आज कांतीलाल कोठारी संजय कोठारी यांनी जैन श्रावक संघाच्या माध्यमातून हे शिबिर घेतले खूप चांगले काम केले सर्वांनी या शिबिराचे लाभ घ्यावा

या शिबिरात विना औषध खालील रोगावर उपचार केले जातील डोकेदुखी ,साईटिका ,डोळे ,कान, नाक, गळ्याचे रोग, मुतखडा ,उंची वाढवणे, गुडघेदुखी, लट्टपणा, ब्लड प्रेशर, मधुमेह, कब्ज-ग्यास , सवाईकल आजार, मानेचा रोग ,कंबर दुखी ,सांधेदुखी, लकवा ,संधिवात , दमा ,मानसिक तणाव ,झोप न येणे अशा विविध रोगावर औषधाशिवाय मोफत उपचार केले जातील अशी माहिती जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी यांनी दिली.

या कार्यक्रमात प्रत्येक पेशंट वर दररोज १५ते २० मिनिट इलाज केला जाईल या शिबिराची मंगळवार दिनांक ३ जानेवारी २०२३ पासून रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३पर्यंत राहणार आहे या शिबिरामध्ये सहा दिवस प्रत्येकास पंधरा-वीस मिनिट आजार पाहून इलाज केले जातील या शिबिराच्या वेळी रजिस्ट्रेशन फी फक्त शंभर रुपये घेतले जातील ची माहिती डॉक्टर प्रवीण सारंग आणि डॉक्टर जी.आर. चौधरी यांनी दिली.

या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी आणि श्रावक संघाचे पदाधिकारी यांनी केले आहे. या कार्यक्रमास कांतीलाल कोठारी अध्यक्ष जैन श्रावक संघ, जामखेड, संजय कोठारी, डॉक्टर प्रताप गायकवाड ,अशोक पितळे ,अनिल फिरोदिया, राहुल अहिरे, कुंदन भंडारी, आसराज बोथरा, कांतीलाल भळगट, केशरमल फिरोदिया, उमर कुरेशी ,मोहनलाल भंडारी, राजेंद्र गोरे ,प्रकाश काळे ,संजय नहार आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here