जामखेड येथे सकल जैन समाज्याच्या वतीने पाच दिवशीय एक्यूप्रेशर, वाइब्रेशन, सुजोक, चिकित्सा शिबीराचे आयोजन
३ जानेवारी २०२३ ते ८ जानेवारी २०२३ आसे पाच दिवस असणार शिबिर
जामखेड (प्रतिनिधी) जामखेड येथे उद्या दि. ३ फेब्रुवारी पासुन श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व एक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्थान, जोधपुर (राजस्थान) यांच्या वतीने एक्यूप्रेशर, वाइब्रेशन, सुजोक, चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते करण्यात येणार असून मोठय़ा संख्येने शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्या मंगळवार दि. ३ जानेवारी ते रविवार दि. ८ जानेवारी २०२३ दरम्यान जामखेड शहरातील महावीर सांस्कृतिक भवन येथे मंगळवार, ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन होणार असून हे शिबीर दररोज सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत दुपारी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. ६ दिवस चालणाऱ्या या हे शिबीर पुर्णपणे मोफत आहे. मात्र नाव नोंदणीसाठी (रजिस्ट्रेशनसाठी) रू. १०० फी भरावी लागणार आहे.
या शिबिरात खालील रोगांवर उपचार केले जातील..
१)डोके दुखी २)साईटिका ३) डोळे ४) नाक कान गळ्याचे रोग ५) मुतखड़ा ६) उंची वाढविणे ७)गुडघेदुखी ८) लठ्ठपणा ९)ब्लडप्रेशर १०) मधुमेह ११) कब्ज गॅस १२)सवाईकल आजार १३) मानेचा रोग १४) कंबरदुखी १५) सांधेदुखी १६) लकवा १७) संधीवात १८)दमा १९) मानसिक तणाव २० झोप न येणे.
अशा विविध रोगांवर औषधाशिवाय उपचार करण्यात येणार आहेत. मात्र या शिबिरात पेशंटवर दररोज १५-२० मिनीटे इलाज केला जाईल याची नोंद घ्यावी या संधीचा अधिकाधिक रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सकल जैन समाज जामखेड यांच्या कडुन करण्यात आले आहे.





