
आ. प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात मोफत भोजन व पाटोदा येथे रक्तदान शिबिर संपन्न
भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य दिनकर टापरे यांनी केले होते आयोजन
जामखेड (प्रतिनिधी) पाटोदा येथील भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य दिनकर टापरे यांनी आमदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील अनाथ मुलांना एक वेळचे भोजन व पाटोदा येथे त्यांच्या 54 व्या वाढदिवसानिमित्त 54 रक्तदान घडून आणले. नामदार राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम करून आ. प्रा राम शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला त्याप्रसंगी पाटोदा भवरवाडी खामगाव येथील सर्व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

पाटोदा येथील कार्यक्रमासाठी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अंगद गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य सदाशिव कवादे, सचिन शिंदे, पंढरीनाथ शिकारे, पप्पू पारवे, अशोक महारनवर, चेअरमन संतोष टापरे, बिभीषण कवादे, चेअरमन गप्पारभाई पठाण माजी सरपंच, अनिरुद्ध थोरात संचालक, खंडू कवादे युवा नेते भाजपा, राजू कवादे, दत्तात्रय शितोळे खंडू निंबाळकर, अक्षय भाई आमटे, युवा नेते खामगाव, विष्णू बामदाळे युवा नेते भवरवाडी, दादा मेंडकर, दत्तू भवर, दिलीप नाना कवादे, दादा कदम सरपंच पाटोदा दादा पारवे अरुण टापरे किशोर टापरे अशोक आमटे दादा राऊत राजू कात्रजकर देवा मोरे बबलू शिरसाट गोवर्धन पेचे अक्षय पेचे व भारतीय जनता पार्टी पाटोदा भवरवाडी खामगाव येथील पदाधिकारी उपस्थित होते.

माजी मंत्री व आ. प्रा. राम शिंदे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुका जामखेड येथे आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण ५४ बॅग रक्तदान करण्यात आले. साहेबांनी या रक्तदान शिबिरास प्रत्यक्ष भेट दिली व भारतीय जनता पार्टी पाटोदा च्या वतीने केक कापून साहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित पाटोदा खामगाव भवरवाडी सांगवी मुसलमान वाडी येथील सर्व ग्रामस्थांनी साहेबांना वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या.






