तपनेश्वर भागातील घराला शॉर्टसर्किटमुळे आग, संसारोपयोगी वस्तू जळुन खाक ; लाखो रुपयांचे नुकसान

जामखेड (प्रतिनिधी) जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील रहिवासी आसलेले बाळासाहेब भानुदास भोसले, तपनेश्वर गल्ली भोसले नगर, यांच्या घराला सायंकाळच्या सुमारास आग लागून घरातील संसार उपयोगी वस्तू जळुन खाक झाल्या. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

या बाबत मिटलेली माहीती आशी की जामखेड शहरातील तपनेश्वर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाठीमागे रहात आसलेल्या बाळासाहेब भानुदास भोसले यांच्या घरातील महीला घराबाहेर ओट्यावर काम करत आसताना काल दि ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घरा मधुन घुर निघत आसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी घरामध्ये जाऊन पाहीले असता बेडरुम मध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली व या आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. यानंतर तातडीने जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलास कळविण्यात आले अग्निशमक दलाचे वहान देखील वेळेवर आले मात्र तो पर्यंत घरातील कपाट, रोख रक्कम, कपडे, कुलर, दोन दरवाजे, व काही सोने असे संसार उपयोगी वस्तू जळुन खाक झाल्या.

आग विझवण्यासाठी परीसरातील सोनु गुरसाळी, हरी जाधव, महेंद्र आदे, राजु जाधव, दत्त्ता पवार, जालिंदर जाधव, शहावाबज शेख पिंटु डुचे, पप्पू कुलकर्णी, खंडु कडेकर, बालाजी भोसले तसेच अग्निशमन दलाचे विजय पवार व आय्यज शेख यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here